सुनील ढगे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, नागपूर | 03 डिसेंबर 2023 : वर्ल्ड कप फायनल मॅच भारतीय क्रिकेट संघ हारल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक विधान केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मॅच बघण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होते. त्यामुळे ही मॅच भारत हारला. ते पनौती आहेत, असं विधान राहुल गांधी यांनी केलं. त्यांच्या या विधानाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं आहे. चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागतोय. या निकालाबद्दल बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
पनौती हा शब्द राहुल गांधी यांनी उच्चारला होता. पण खरी पनौती होती कोण आहे, हे जनतेने आज दाखवून दिलं आहे. पंतप्रधान मोदींबद्दल अपपशब्द बोलणं हे जनतेला मान्य नाही. या देशातील प्रत्येक मतदार नरेंद्र मोदी यांना मतदान करत आहे. महिला मतदाराचा मी अभिनंदन करतो. मोठ्या प्रमाणात मतदार या पंतप्रधान नरेंद्र यांच्या पाठीशी उभे आहे. आज या निकालामध्ये दिसत आहे, असं बावनकुळे म्हणाले आहेत.
तीन राज्यात भाजपला घवघवीत यश मिळालं. महाराष्ट्रात सुद्धा अशाचं पद्धतीचं वातावरण आहे. महायुतीचे उमेदवार 45 च्यावर जागा निवडून येतील. त्यामुळे मोठा विजय आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.
तेलंगणात काय झालं तेलंगणामध्ये कुठली ईव्हीएम मशीन गेली होती? काँग्रेस पक्षाने पंतप्रधान यांना पनवती मोदीजींना म्हटलं पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली होती. जनतेने दाखवून दिलं पनवती कोण आहे. राजस्थानमध्ये ज्या पद्धतीने पराभव झाला. छत्तीसगडमध्ये विश्वास दाखवला. शिवराज सिंह चव्हाण, वसुंधरा राजे आहेत. छत्तीसगडमध्ये बघा आदिवासी सदस्य निवडून आले आहेत. मध्यप्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात 18 पगड जातीय लोक आहेत.त्यांनी भाजपला मतदान केलं. मोदीजींवर लोकांचा विश्वास आहे. जेव्हा काँग्रेस निवडून तिथे तेव्हा ईव्हीएम खराब नसतं. पण आपण हारलो की ईव्हीएमवर खापर फोडणं बरोबर नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.
काँग्रेस पक्षाने या पद्धतीने 65 वर्ष भ्रष्टाचार आणि समाजाच्या गरीब कल्याण्याकरता कुठलेही काम केलं नाही. मोदीजींनी साडेनऊ वर्षात या कामाचा हा विश्वास आणि विजय आहे. या कामाला मत मिळाली आहेत. मोदीजीच्या स्वच्छ सरकारला जनतेने मतदान केला आहे देशात साडेतीनशेच्यावर खासदार भाजपचे निवडून येतील. महाराष्ट्र 45 पेक्षा जास्त भाजपचे खासदार निवडून येतील. हा मोठा विजय होईल, असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.