नागपुरात काँग्रेसला सुरुंग, माजी नगरसेवकासह 200 ते 250 कार्यकर्ते शिवसेनेत

| Updated on: Oct 12, 2020 | 9:09 AM

सतिश चतुर्वेदी यांचे खंदे समर्थक आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक दिपक कापसे यांनी शिवसेनेतं प्रवेश केला आहे. (Nagpur Congress ex corporator join shivsena) 

नागपुरात काँग्रेसला सुरुंग, माजी नगरसेवकासह 200 ते 250 कार्यकर्ते शिवसेनेत
Follow us on

नागपूर : माजी मंत्री सतिश चतुर्वेदी यांनी आपल्या मुलाच्या भविष्यासाठी काँग्रेसला सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना आमदार दुष्यंत चतुर्वेदी शिवसेनेचे नागपूर प्रभारी झाल्यानंतर त्यांनी वडिलांच्या मदतीनं शहरातील काँग्रेस फोडण्यास सुरुवात केली. नुकतंच सतिश चतुर्वेदी यांचे खंदे समर्थक आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक दिपक कापसे यांनी शिवसेनेतं प्रवेश केला आहे. (Nagpur Congress ex corporator join shivsena)

 

काँग्रेसचे माजी नगरसेवक दिपक कापसे यांच्यासह तीन मोठ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यात नाना झोडे, श्रीकांत कैकाडे, हरिश रामटेकेंचा समावेश आहे. नागपूर शहरातील चार प्रमुख नेत्यांसह 200 ते 250 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेचे माध्यम समन्वयक नितीन तिवारींच्या उपस्थितीत या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

पण या निमित्तानं पुन्हा एकदा नागपुरात काँग्रेस आणि शिवसेनेत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. सतिश चतुर्वेदी नागपुरातील काँग्रेसचं मोठं नावं होतं. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचीही मोठी फळी होती. तेच कार्यकर्ते आता मुलाच्या भविष्यासाठी शिवसेनेत पाठवले जात आहेत. पण वडिलांच्या कार्यकर्त्यांच्या भरवशावर नागपुरात आमदार दुष्यंत चतुर्वेदी सेनेला उभारी देणार का? हाच मोठा प्रश्न आहे.

कारण शिवसेनेचे माजी खासदार प्रकाश जाधव, माजी उपजिल्हाप्रमुख चिंटू महाराज यांच्यासह सेनेतील अनेक जुने नेते दुष्यंत चतुर्वेदी यांच्यावर नाराज असल्याची चर्चाही रंगली आहे.(Nagpur Congress ex corporator join shivsena)

संबंधित बातम्या : 

‘एकनाथ खडसे पक्षांतर करतील हे सत्य आहे’, गुलाबराव पाटलांचं मोठं विधान

मोठ्या माणसांवर टीका केल्याशिवाय काहींना प्रसिद्धीच मिळत नाही, रोहित पवारांचे नाव न घेता चंद्रकांत पाटलांची टीका