नागपूर : तब्बल पाच दशकांहून अधिक काळ नागपूर पदवीधर मतदारसंघावर वर्चस्व राखणाऱ्या भाजपला (BJP) यंदा महाविकास आघाडीच्या एकत्रित ताकदीमुळे धक्का बसण्याची शक्यता आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघातील मतदारांच्या पहिल्या पसंतीच्या मतांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. यामध्ये महाविकास आघाडीच्या अभिजित वंजारी (Abhijit vanjari) यांनी मोठी आघाडी घेतली आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत (Nagpur Graduate Constituency Election) विजयी होण्याचा कोटा हा 60 हजार 747 मतांचा आहे, तर काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांना आतापर्यंत 55 हजार 947 मतं मिळाली आहेत. त्यामुळे वंजारी विजयाच्या उंरठ्यावर आहेत, असे म्हणता येईल. (Nagpur Graduate Constituency Election; Congress candidate Abhijit Vanjari close to victory)
नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत आतापर्यंत कोणत्याही उमेदवाराला विजयी मतांचा कोटा (60 हजार 747 मत) पूर्ण करता आलेला नाही. त्यामुळे आता दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू आहे मतदारांच्या पहिल्या पसंतीमध्ये अभिजित वंजारी यांना 55 हजार 947 मतं मिळाली आहेत. तर भाजप उमेदवार संदीप जोशी (Sandeep Joshi) यांना 41 हजार 540 मतं मिळाली आहे. वंजारी यांना 14 हजार 407 मतांची आघाडी मिळाली आहे. सध्या मतदारांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरु आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड विजयी
पुणे पदवीधर मतदारसंघावर (Pune graduate constituency election) महाविकास आघाडीने झेंडा फडकवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड (Arun Lad) यांनी या निवडणुकीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत अरुण लाड यांना तब्बल 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली आहेत, तर भाजप उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांना 73 हजार 321 मते मिळाली आहेत. लाड यांनी या निवडणुकीत 48 हजार 824 मतांची आघाडी मिळवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. लाड यांनी 1 लाख 14 हजार 137 मतांचा कोटा पूर्ण करून विजय मिळवला आहे. (NCP’s Arun Lad wins Pune graduate constituency election)
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांची विजयाची हॅटट्रिक
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सलग दोन वेळा विजयी ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण (Satish Chavan) यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे. महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. सतीश चव्हाण यांना तब्बल 116638 मते मिळाली आहेत. तर भाजपच्या शिरीष बोराळकर यांना 58743 मतांवर समाधान मानावं लागलं आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण जवळपास 57895 मताधिक्क्यानं विजयी झाले आहेत.
संबंधित बातम्या
णे पदवीधर मतदारसंघावर महाविकास आघाडीचा झेंडा, राष्ट्रवादीचे अरुण लाड विजयी
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांची विजयाची हॅटट्रिक, बोराळकर पराभूत
(Nagpur Graduate Constituency Election; Congress candidate Abhijit Vanjari close to victory)