नागपूर: विधान परिषद निवडणुकीच्या (Legislative Council Election) पार्श्वभूमीवर नागपूर काँग्रेसमध्ये मोठी घडामोड पाहायला मिळाली. विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना काँग्रेसवर (Congress) उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढावली होती. काँग्रेसनं छोटू भोयर (Chhotu Bhoyar) यांच्या ऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तर, प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलेला उमदेवार बलण्यास भाग पाडून जिल्ह्यातील काँग्रेस मंत्र्यांनी नाना पटोले यांना दणका दिल्याची राजकीय चर्चा सुरु आहे.
विधानपरिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संसंथा मतदारसंघासाठी जाहीर करण्यात आलेला काँग्रेस उमेदवार बदलवून प्रदेशाध्यक्षांना दणका देण्यात आल्याची राजकीय चर्चा सुरु झाली आहे. प्रदेशाध्यक्षांनी विधानपरिषद निवडणुकीत दिलेला उमेदवार काँग्रेसने 12 तास आधी बदलला. उमेदवार बदलावरुन काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. नाना पटोले यांनी छोटू भोयर यांना उमेदवारी दिली होती. मतदानाच्या 12 तासा आधी नागपूरातील काँग्रेसच्या मंत्र्यांनी उमेदवार बदलला होता.
उमेदवार बदलण्यासाठी काँग्रेस मंत्र्यांची बैठक
नागपूर विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसनं छोटू भोयर यांना उमदेवारी दिली होती. मंत्री सुनील केदार, आमदार अभिजीत वंजारी, मंत्री नितीन राऊत यांच्या उपस्थितीत उमेदवार बदलण्याबाबत चर्चा झाली होती. यानंतर नाना पटोले यांच्या संमतीनं छोटू भोयर यांच्या ऐवजी मंगेश देशमुख यांना काँग्रेस समर्थन दिलं होतं.
भाजपला नागपूर पदवीधर मतदारसंघात पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर भाजपनं यावेळी दक्षता घेत त्यांचे सर्व मतदार सहलीला पाठवले होते. काँग्रेसनं भाजपचे नगरसेवक छोटू भोयर यांना फोडून त्यांना उमेदवारी देत पहिला धक्का दिला होता. अजून पडझड होऊ नये म्हणून भाजपनं दक्षता घेतली होती. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उमेदवारीमुळं निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती.
इतर बातम्या:
राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात राजेंद्र शिंगणे यांचा कार्यकर्त्यांशी संवाद
Nagpur MLC Election congress changes candidates due to pressure of Congress Minister and this is setback given to Nana Patole