मुंबई : नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव म्हणून मुंढे यांची बदली झाली. तुकाराम मुंढे यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली आहे. (Nagpur Municipal Commissioner IAS Officer Tukaram Mundhe transferred to Mumbai)
नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना तुकाराम मुंढे यांनी महापालिका आयुक्त म्हणून कडक निर्बंध आणल्याचे दिसत होते. मात्र यावरुनच महापौर आणि भाजप नेते संदीप जोशी यांच्याशी मुंढे यांचे तीव्र मतभेद पाहायला मिळाले.
कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी अशी ओळख असलेले तुकाराम मुंढे वर्षाच्या सुरुवातीला राज्याच्या एड्स नियंत्रण प्रकल्पाचे संचालक म्हणून काम पाहत होते. जानेवारी महिन्यातच नागपूरचे महापालिका आयुक्त म्हणून बदली झाली होती. त्यानंतर अवघ्या सात महिन्यात त्यांची पुन्हा एकदा ट्रान्स्फर ऑर्डर निघाली आहे.
तुकाराम मुंढे यांची कारकीर्द
नागपूर जिल्हा परिषदेवर 2008 साली तुकाराम मुंढे यांची सीईओ म्हणून नियुक्ती झाली. त्याच दिवशी त्यांनी शाळेला भेटी दिल्या आणि गैहजर शिक्षकांचं निलंबन केलं. वैद्यकीय कारभारात अनियमितता दिसल्याने काही डॉक्टरांनाही निलंबित केलं.
सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना वाळू माफियांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. त्यांना वाळू माफियांच्या रोषाचाही सामना करावा लागला. पंढरपूर मंदिर समितीच्या चेअरमनपदी नियुक्ती झाल्यानंतर मुख्यमंत्री सोडून इतरांचं व्हीआयपी दर्शन बंद केलं.
हेही वाचा : डर जरुरी है! तुकाराम मुंढे हजर होण्यापूर्वीच कर्मचारी वेळेत येण्यास सुरुवात!
नवी मुंबईत महापालिका आयुक्तपदी बदली झाली. नवी मुंबईत आल्यानंतर अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरु केली आणि तिथेच तुकाराम मुंढे सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आले. नवी मुंबईतही त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला.
नवी मुंबईतून पुण्यात पीएमपीएमएल अध्यक्षपदी बदली झाली. पुण्यात गेल्यानंतर त्यांनी तोट्यात असलेल्या पीएमपीएमएलचा महसूल वाढवण्यासाठी अनेक पाऊलं उचलली, नियम बदलले आणि नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून सुविधा दिल्या. पण पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या निलंबनामुळे त्यांची कारकीर्द पुन्हा एकदा चर्चेत आली.
पुण्यातून तुकाराम मुंढे यांची बदली नाशिकला करण्यात आली. तिथे ते किमान एक वर्ष पूर्ण करतील, अशी अपेक्षा होती. पण एका वर्षाच्या आतच त्यांची मंत्रालयात बदली करण्यात आली. (Nagpur Municipal Commissioner IAS Officer Tukaram Mundhe transferred to Mumbai)
नागरिक तुकाराम मुंढेंच्या कामाचं नेहमीच कौतुक करतात आणि त्यांच्या मागे खंबीरपणे उभे असतात. पण राजकारण्यांना त्यांचं एवढं वावडं का? असा प्रश्न उपस्थित केला जातो.
‘पवार साहेबांचा एक फोन पुरेसा’, नगरमधील शेतकऱ्यांची बागायत जमीन लष्कराला देण्याला बाळासाहेब थोरातांचा विरोधhttps://t.co/dJAGGE4Upj#BalasahebThorat #SharadPawar #Ahmednagar @bb_thorat @PawarSpeaks
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 26, 2020
संबंधित बातम्या :
तुकाराम मुंढेंना सॅल्यूट कसा मारायचा? सीनियरकडून ज्युनिअरला प्रशिक्षण, वेळेआधीच मुंढे कार्यालयात
(Nagpur Municipal Commissioner IAS Officer Tukaram Mundhe transferred to Mumbai)