नागपूर : भाजपाच्या ताब्यात असलेली नागपूर महानगरपालिका (NMC election 2022) यंदा कुणाच्या हाती जाणार? भाजपा बाजी मारणार की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी विजय संपादन करणार, असे प्रश्न सध्या अनेकांना पडले आहेत. मात्र लवकरच नागपूर महापालिकेत कोण विजयी होणार हे स्पष्ट होणार आहे. 2017सालच्या निवडणुकीत येथील प्रभाग 34मध्ये भाजपाने निर्विवाद वर्चस्व मिळवले होते. चार सदस्यीय प्रभागरचना (Ward) मागील वेळी होती. या वॉर्डात चारही ठिकाणी भाजपाने यश संपादन केले. यावेळी तीन नगरसेवकांचे पॅनल असणार आहे. त्यामुळे तीन जणांच्या पॅनेलमध्येही भाजपाच जिंकणार की काही वेगळी गणिते पाहायला मिळणार, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. यावेळी वॉर्डांची रचना बदलली आहे, तसेच आरक्षणातही बदल करण्यात आला आहे. तर इच्छुक आपले मतदार (Voter) टिकवून ठेवण्यासाठी गाठीभेटी घेत आहेत. 151 जागांसाठी 52 प्रभागांत मतदान होणार आहे.
रामबाग इमामवाडा, इंदिरानगर, जात्तरोडी, गणेशपेठ, एम्प्रेससीटी, महात्मा फुले मार्केट, गोदरेज आनंदमसीटी, टाटा कॅपिटल हाइट्स, शुक्रवारी तलाव, म्हाडा सीटी, मोक्षधाम, बारासिंगल, बोरकरनगर अशी व्याप्ती असून कॉटन मार्केट रोड, चिटणीस पार्क, रुईकर चौक, ग्रेट नाग रोड, अशोक चौक, बैद्यनाथ चौक अशी काही महत्त्वाची स्थाने आहेत.
प्रभाग क्रमांक 34 मधील एकूण लोकसंख्या 48,868 आहे. यात अनुसूचित जातीची एकूण संख्या 15,148 असून अनुसूचित जमातीची एकूण लोकसंथ्या 1547 इतकी आहे.
भाजपाच्या हाती नागपूरची महानगरपालिका आहे. प्रभाग 34मध्येदेखील नागरिकांची पसंती भाजपालाच असल्याचे मागील वेळी पाहायला मिळाले होते. यंदा प्रतिस्पर्धी उमेदवार किती बलाढ्य असेल, यावर सर्व निकाल अवलंबून असणार आहे.
प्रभाग 34 (A)
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजपा | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
प्रभाग 34 (B)
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजपा | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
प्रभाग 34 (C)
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजपा | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
मागील वेळी असलेले आरक्षण यंदा बदलले आहे. यानुसार 34 अ हा अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी राखीव असणार आहे. ब हा सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी तर क हा सर्वसाधारण उमेदवारासाठी यावेळी राखीव ठेवण्यात आला आहे.