ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी ईडीच्या आरोपपत्रात काँग्रेस नेते अहमद पटेल यांचं नाव

| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाकडून अनेक खुलासे करण्यात आले आहेत. ईडीने (ED) ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे नाव असल्याचे समोर आले आहे. या घोट्याळ्यातील दलाल क्रिश्चन मिशेलने आपल्या नोंदीतील AP म्हणजे अहमद पटेल आणि FAM म्हणजे फॅमिली असल्याचे म्हटल्याची माहिती ईडीने दिली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर काही मोठ्या […]

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी ईडीच्या आरोपपत्रात काँग्रेस नेते अहमद पटेल यांचं नाव
Follow us on

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाकडून अनेक खुलासे करण्यात आले आहेत. ईडीने (ED) ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे नाव असल्याचे समोर आले आहे. या घोट्याळ्यातील दलाल क्रिश्चन मिशेलने आपल्या नोंदीतील AP म्हणजे अहमद पटेल आणि FAM म्हणजे फॅमिली असल्याचे म्हटल्याची माहिती ईडीने दिली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर काही मोठ्या नेत्यांचा दबावही होता, असाही दावा मिशेलच्या एका पत्रात करण्यात आला आहे.

ईडीने आपल्या पुरवणी आरोपपत्रात म्हटले, ‘लाच स्विकारणाऱ्यांमध्ये अनेक क्षेत्रातील लोकांचा सहभाग होता. व्यवहार होत होता, तेव्हा सैन्यातील अधिकाऱ्यांना, नोकरशहांना, माध्यमातील लोकांना आणि सत्ताधारी पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांना लाचेचा एक भाग देण्यात आला होता.’ या आरोपपत्रात ईडीने 3 नव्या नावांचा समावेश केला आहे. त्यात डेविड सिम्स, मिशेलची कंपनी ग्लोबल सर्विस लिमिटेड आणि ग्लोबल ट्रेडिंग लिमिटेडचाही समावेश आहे. मिशेलने पैसे स्विकारण्यासाठी या कंपन्यांचा उपयोग केला होता.

इटालीयन महिलेच्या मुलाचाही उल्लेख

समोर आलेल्या अहवालांनुसार आरोपपत्रात इटालीयन महिलेच्या मुलाचाही उल्लेख आहे. या मुलाचा उल्लेख करताना भारताचा पुढील पंतप्रधान असा केला आहे. संबंधित आरोपपत्र गुरुवारी दिल्लीतील न्यायालयात सादर करण्यात आले. विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांनी संबंधित आरोपपत्राची दखल 6 एप्रिलला घेणार असल्याचे सांगितले. दरम्यान, ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील आरोपी मिशेलला 4 डिसेंबर 2018 ला संयुक्त अरब अमिरात येथून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले होते.

पाहा व्हिडीओ: