मुंबईः अधेरी पोटनिवडणुकीत (Andheri byelection) महाविकास आघाडीचा शिवसेनेला पूर्ण पाठींबा असेल, असा शब्द काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिलाय. या निवडणुकीच्या संदर्भाने आज महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) काँग्रेस नेत्यांनी महत्त्वपूर्ण बैठक मातोश्री बंगल्यावर झाली. यात नाना पाटोले, भाई जगताप, अमित देशमुख यांचा समावेश होता. महाविकास आघाडीत ज्या ज्या पोटनिवडणुका लागतील, तिथे ज्या पक्षाचे नेते उभे राहतील, तिथे पाठींबा देण्याचं ठरलं होतं. त्यानुसार काँग्रेस शिवसेनेसोबत आहेत, असं नाना पटोले म्हणाले.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर मुंबईतील ही प्रतिष्ठेची लढाई होणार आहे. अर्थातच भाजप आणि शिंदे गटाने येथे सर्व शक्ती पणाला लावली आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीसाठीच शिंदे गटाने शिवसेना आणि धनुष्यबाणाचा निर्णय निवडणूक आयोगाने लवकरात लवकर घेण्याची घाई केल्याचा आरोप शिवसेनेतर्फे करण्यात येतोय.
मात्र या निवडणुकीसाठी भाजप उमेदवार उभा करणार असल्याचं म्हटलं जातंय. . शिंदे गटाचा उमेदवार नसताना ही घाई कशासाठी? असा सवाल शिवसेनेकडून केला जातोय.
येथील आमदार रमेश लटके यांचं मे 2022 मध्ये दुबई येथे निधन झालं. त्यानंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उद्धव ठाकरे गटातर्फे उमेदवारी देण्यात आली आहे. तर रमेश लटके यांनी 2019 च्या निवडणुकीत ज्या भाजप उमेदवाराला पराभूत केलं होतं, त्या मूरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात येईल, असं म्हटलं जात आहे. मात्र याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.