काँग्रेसशिवाय भाजपा विरोधी आघाडी यशस्वी होणार? राज्यातील काँग्रेस नेत्यांचं मत काय? जाणून घ्या

| Updated on: Feb 20, 2022 | 8:19 PM

आज केसीआर, ठाकरे आणि पवारांच्या भेटीवर काँग्रेस नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'भाजपचा खरा चेहरा त्यांच्या लक्षात आला असून भाजपच्या हुकुमशाही विरोधात प्रादेशिक पक्षांना एकत्रित आणण्याचा त्यांचा प्रयत्न स्वागतार्ह आहे. पण काँग्रेस पक्षाशिवाय भाजपाविरोधातील आघाडी पूर्ण आणि यशस्वी होणार नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय.

काँग्रेसशिवाय भाजपा विरोधी आघाडी यशस्वी होणार? राज्यातील काँग्रेस नेत्यांचं मत काय? जाणून घ्या
नाना पटोले, यशोमती ठाकूर, उद्धव ठाकरे, शरद पवार
Follow us on

मुंबई : तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K Chandrashekhar Rao) यांनी महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. त्यामुळे देशात पुन्हा एकदा तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न जोरकसपणे सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनीही मुंबईत येत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली होती. आज केसीआर, ठाकरे आणि पवारांच्या भेटीवर काँग्रेस नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘भाजपचा खरा चेहरा त्यांच्या लक्षात आला असून भाजपच्या हुकुमशाही विरोधात प्रादेशिक पक्षांना एकत्रित आणण्याचा त्यांचा प्रयत्न स्वागतार्ह आहे. पण काँग्रेस पक्षाशिवाय भाजपाविरोधातील आघाडी पूर्ण आणि यशस्वी होणार नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटलंय.

पटोले म्हणाले की, केंद्रीतल भाजपा सरकार हुकुमशाही वृत्तीने वागत आहे. संविधान आणि लोकशाही संपवण्याचे आणि देशाची मालमत्ता विकण्याचे काम सुरु आहे. भाजप विरोधकांसोबतच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करणाऱ्या मित्र पक्षांनाही संपवत आहे. याचा अनेक पक्षांना अनुभव आल्याने आता ते पक्ष भाजपपासून दुरावले आहेत. के. चंद्रशेखर राव यांनी उघडपणे केंद्रातील भाजप सरकारविरोधी भूमिका घेऊन भाजपा विरोधात आघाडीसाठी प्रयत्न चालवले आहेत. यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही अशा आघाडीसाठी विविध राज्यात जाऊन नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. पण पुढे यासंदर्भात काही ठोस घडले नाही. राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीने लोकसभा आणि राज्यसभेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत होईल अशा भूमिका घेतल्या होत्या. पण आता भाजपबद्दलचे त्यांचे विचार बदलले आहेत.

‘काँग्रेस आणि मित्रपक्षांची यूपीए आघाडी हाच सक्षम पर्याय’

तसंच ‘भाजप हा लोकशाही आणि संविधानविरोधी असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यांच्या या बदललेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. के. चंद्रशेखर राव यांच्याप्रमाणेच विविध राजकीय पक्ष आणि देशातील सर्वसामान्य जनतेला भाजपचा खरा चेहरा लक्षात आला आहे. देशातील जनता भाजपला सत्तेवरून पायउतार केल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेस आणि मित्रपक्षांची यूपीए आघाडी हीच भाजपाविरोधात सक्षम पर्याय असून काँग्रेसला वगळून प्रादेशिक पक्षांची भाजपला पर्याय होऊ शकत नाही, असंही पटोलेंनी म्हटलंय.

‘विरोधी पक्षांच्या आवाजाला बळकटी मिळतेय ती काँग्रेसमुळेच’

काँग्रेस नेत्या आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनीही राव, ठाकरे आणि पवारांच्या भेटीबाबत प्रतिक्रिया दिलीय. ‘काँग्रेसला वगळून मोदींविरोधातली लढाई यशस्वी होणार नाही. काँग्रेसने अतिशय प्रामाणिकपणे ‘संघी’ अजेंड्याविरोधात लढाई लढली आहे. आज देशात बदलाचे जे वारे वाहतायत, विरोधी पक्षांच्या आवाजाला जी बळकटी मिळतेय ती काँग्रेसमुळेच आहे’, असं ट्वीट यशोमती ठाकूर यांनी केलं आहे.

इतर बातम्या :

Amit Thackeray | नवी मुंबईत मनसेच्या 3 नव्या शाखा, उद्घाटनासाठी अमित ठाकरेंची हजेरी!

Shweta Mahale : भाजप आमदार श्वेता महालेंसह अनेकांवर गुन्हे दाखल, विनापरवानगी मोटारसायकल रँली काढल्याप्रकरणी कारवाई