प्रदीप कापसे, टीव्ही 9 मराठी, रायपुर : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीच्या ( Kasaba Election ) संदर्भात गंभीर आरोप केला आहे. यामध्ये निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचे सांगत कारवाईची मागणी केली आहे. याशिवाय नाना पटोले यांनी मंत्री पोलीस संरक्षणात पैसे वाटप करीत असल्याचा आरोप करत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. याशिवाय रवींद्र धंगेकर यांनाच मी उपोषण मागे घ्यायला लावले असल्याचे नाना पटोले यांनी म्हंटले आहे. लोकांना विकत घेऊन निवडणुका जिंकायच्या अशी भारतीय जनता पार्टी आहे असा टोलाही यावेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे.
छत्तीसगड येथील रायपुर येथे कॉंग्रेसचे महाअधिवेशन सुरू आहे. त्यामध्ये राज्यातील बहुतांश नेते सहभागी झाले आहे. त्याच दरम्यान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलत असतांना गंभीर आरोप केले आहे.
रवींद्र धंगेकरांना मी सांगितले आंदोलन मागे घ्या लोकांमध्ये जा असं कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दावा दावा केला आहे. यावेळी मात्र लोकांना विकत घेऊन निवडणूक जिंकू अशी भारतीय जनता पार्टी असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
पुण्यातील कसबा मतदार संघात भाजपचे मंत्री पोलिसांच्या संरक्षणात पैसे वाटतायेत असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी करत त्याचे व्हीडीओ आमच्याकडे आहेत असा दावाच पटोले यांनी करत खळबळ उडवून दिली आहे.
कसबा पेठेत निवडणुकीच्या दरम्यान जो प्रकार घडला आहे त्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे, निवडणूक आयोगाने त्या तक्रारीची दखल घेऊन कारवाई केली पाहिजे अशी मागणीही पटोले यांनी केली आहे.
विधानपरिषदेच्या निवडणूकीत कोणाला फटका बसला पाहिलं आहे, असं म्हणत नाना पटोले यांनी भाजपवर निशाना साधला आहे. कसबा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय निश्चित असल्याचा दावाही नाना पटोले यांनी केला आहे.
रायपुर येथील कॉंग्रेसच्या अधिवेशनाला जाण्यापूर्वी नाना पटोले हे कसबा मतदार संघात तळ ठोकून होते. कसबा पोटनिवडणूक कुठल्याही परिस्थितीत जिंकायची याबाबत कॉंग्रेसने सर्व ताकद लावली आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण काळात कॉंग्रेसमधील बंडखोर उमेदवार सुद्धा माघार घ्यायला लावली होती.
एकूणच कॉंग्रेससह महाविकास आघाडी सरकारने कसबा आणि चिंचवडची निवडणूक जिंकून आणायची असा पणच एक प्रकारे केला आहे. त्यात भाजपवर गंभीर आरोप करत पुरावे असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे.