“कोश्यारी यांना 1 मिनिटही राज्यपालपदावर राहण्याचा अधिकार नाही!”, नाना पटोले आक्रमक

| Updated on: Nov 20, 2022 | 1:06 PM

नाना पटोले यांनीही कोश्यारी यांच्या विधानाचा निषेध केलाय...

कोश्यारी यांना 1 मिनिटही राज्यपालपदावर राहण्याचा अधिकार नाही!, नाना पटोले आक्रमक
Follow us on

हिंगोली : भगतसिंह कोश्यारी यांना 1 मिनिटही राज्यपालपदी राहण्याचा अधिकार नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटलंय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत केलेल्या विधानावर सर्वस्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. नाना पटोले यांनीही कोश्यारी यांच्या या विधानाचा निषेध केलाय.

खालच्या पातळीवर जाऊन भाजप राजकारण करतंय. राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना गडकरी,पवारांशी केली. हे चूकच आहे. शिवरायांची तुलना कुणासोबतच होऊ शकत नाही. महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्याबाबतही वाईट विधान राज्यपालांनी केलं. शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ात हे खपवून घेतलं जाणार नाही, असं पटोले म्हणालेत.

राज्यपाल कोश्यारींचं विधान

तुम्हा तरूण मुलांना जर कुणी विचारलं तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळतील, असं वादग्रस्त वक्तव्य भगतसिंह कोश्यारी यांनी केलं.

भाजप प्रवक्ते हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी 5 वेळ माफी मागितली म्हणून सांगतात. महाराष्ट्रतील जनता माफ करणार नाही. भाजपने महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा आम्ही तुम्हाला राज्यात फिरू देणार नाही, असा इशाराही नाना पटोलेंनी दिलाय.

सुधांशू त्रिवेदी काय म्हणाले?

“औरंगजेबला पत्र लिहून छत्रपती शिवाजी महाराज यांनी 5 वेळा माफी मागितली”, असं वादग्रस्त वक्तव्य भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलं. यामुळे संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.