मोठी बातमी ! पुन्हा मोठा राजकीय भूकंप…? भूकंपाचं केंद्र भाजपमध्ये? भाजपची डॅशिंग महिला लीडर काँग्रेसच्या वाटेवर?

| Updated on: Jul 07, 2023 | 1:24 PM

महाविकास आघाडी या लोकशाहीचा गळा घोटणाऱ्यांच्या विरोधात मोठा लढा उभा करणार आहोत. आम्ही एक लक्ष तयार केलं आहे. त्याची तयारी करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे, असं नाना पटोले यांनी सांगितलं.

मोठी बातमी ! पुन्हा मोठा राजकीय भूकंप...? भूकंपाचं केंद्र भाजपमध्ये? भाजपची डॅशिंग महिला लीडर काँग्रेसच्या वाटेवर?
bjp
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : राज्यात नवी समीकरणे उदयाला आली आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी काळातही काही समीकरणे निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचा एक गट भाजपसोबत आला आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे सुद्धा अजित पवार यांच्यासोबत असल्याने भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. धनंजय मुंडे यांच्यामुळे पंकजा मुंडे यांच्यावर त्यांच्याच मतदारसंघातून विस्थापित होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे काय निर्णय घेणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. पंकजा मुंडे या काँग्रेसच्या वाटेवर असल्याचीही चर्चा सुरू असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं विधान केलं असून त्याची चर्चा सुरू झाली आहे.

पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर आहेत अशी चर्चा आहे, असा सवाल नाना पटोले यांना विचारण्यात आला. त्यावर स्वागत आहे. पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये येणार असतील तर स्वागत आहे. सोनिया गांधींशी त्यांची चर्चा झाली असेल तर चांगली गोष्ट आहे, असं नाना पटोले म्हणाले. पटोले यांच्या विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसला बदनाम करण्याचा डाव

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवेळी भाजपने एक वातावरण निर्माण केलं होतं. भाजपचे लोक बेताल विधान करत होते. काँग्रेसचे लोक सोडून जातील असं सांगितलं जात होतं. काँग्रेसची बदनामी करण्याचं काम भाजप करत आहे. आमचे कोणीही सोडून जाणार नाही हे आम्ही वारंवार सांगत होतो ते खरंच निघालं, असंही त्यांनी स्पष्ट केलं. महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजप नेहमीच लक्ष विचलीत करत आला आहे. केवळ काँग्रेसची बदनामी करण्यासाठीच हे सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

मोदींचे व्हिडीओ दाखवणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये भाषण केलं. राष्ट्रवादीवर 70 हजार कोटीचा आरोप केला. त्यांच्या या भाषणाचे व्हिडीओ आम्ही लोकांना दाखवणार आहोत. त्यानंतर दोन दिवसाने महाराष्ट्रात भाजपने पाप केलं. बुलढाण्यात मोठा अपघात झाल्यानंतर भाजपने दुसऱ्या दिवशी शपथविधी सोहळा आयोजित केला. भाजपला लाजही वाटली नाही. भाजपचा हा चेहरा आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

भ्रष्टाचार भाजपचा डीएनए

ईडी आणि सीबीआयची भीती दाखवून विरोधकांना फोडलं जात आहे. भ्रष्टाचार हा भाजपचा डीएनए आहे. भ्रष्टाचार भाजपच्या रक्तात आहे. विचारात आहेत. भ्रष्टाचार वाढवणं, त्याला पाठी घालणं हे भाजप करत आला आहे. कर्नाटकाच्या निवडणुकीत वेगळं काय घडलं? पण कर्नाटकाच्या लोकांनी त्यांना जागा दाखवलं, अशी टीकाही त्यांनी केली.