राजस्थान कोर्टाबाहेरील मनुचा पुतळा हटवा, नाना पटोले यांची मागणी; वादाला तोंड फुटणार?

| Updated on: Nov 26, 2023 | 2:51 PM

भाजपा सरकारचे अखेरचं काऊंट डाऊन सुरु झाले आहे. त्यांनी लोकसभेच्या 26 जागा लढवाव्यात किंवा त्यापेक्षा जादा, कॉंग्रेस आघाडीलाच जादा जागा मिळणार आहेत, अशा दावा कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे.

राजस्थान कोर्टाबाहेरील मनुचा पुतळा हटवा, नाना पटोले यांची मागणी; वादाला तोंड फुटणार?
Nana Patole
Follow us on

मुंबई | 26 नोव्हेंबर 2023 : साल 2014 पासून संविधानाला ग्रहण लावण्याचे काम भाजपाने सुरु केले आहे. लोकशाहीच्या चारही स्तंभांना कमजोर करण्याचे काम सुरु आहे. प्रशासकीय यंत्रणेत परिक्षा न घेता आरएसएस विचारांच्या लोकांची नेमणूक केली जात आहे. लोकशाही मार्गाने आलेली सरकारे ईडी, सीबीआयच्या माध्यमातून पाडली जात आहेत. न्याय व्यवस्थेतही न्यायाधीशांच्या नेमणूकीत हस्तक्षेप केला जात आहे. ज्या मनूने चातुर्वण्याचा पुरस्कार केला त्याचा पुतळा राजस्थानच्या हायकोर्टात उभा आहे तो आधी तेथून काढण्यात यावा अशी मागणी कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली आहे.

संविधान दिवसानिमित्त कॉंग्रेसने दादर येथे संविधान बचाव रॅलीचे आयोजन केले होते. त्यावेळी बोलताना कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी वरील मागणी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेच्या 26 जागा लढविणार आहे यावर प्रतिक्रीया देताना नाना पटोले यांनी मोदी सरकारचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. कितीही जागा वाटप करा काही उपयोग नाही. कॉंग्रेस आघाडीच्या जास्त जागा निवडून येतील असा दावाही पटोले यांनी यावेळी केला आहे. लवकरच आम्ही महाविकास आघाडीच्या जागावाटपाकरीता बसून चर्चा करणार असल्याचेही पटोले यांनी सांगितले.

हे सरकार जाहीरातीचं सरकार आहे

भाजपा नेते नितेश राणे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्या सोबत दगडफेकीतील आरोपीचा फोटो समाजमाध्यमावर शेअर केला आहे. याबद्दल पत्रकारांनी विचारले असताना नाना पटोले यांनी कोणी आमचा फोटो काढला म्हणून तो आमच्या पक्षाचा होतो असं होत नाही. एकनाथ शिंदे यांचा उल्लेख हिंदूहृदयसम्राट असा जाहीरातीत केला आहे. याबद्दल विचारले असता त्यांनी शिंदे यांचे आदर्श कोण यावर मला काही बोलायचं नाही. तो त्यांचा प्रश्न आहे. हे सरकारच जाहिरातीचं सरकार आहे. यांनी जाहिरातीसाठी कुठून पैसा येतो हे सर्वांना माहीती आहे असा टोला पटोळे यांनी लगावला.