Congress: गरज पडली तर बाहेरुन आघाडीला पाठिंबा देऊ, काँग्रेस बैठकीनंतर नाना पटोलेंची मोठी घोषणा

| Updated on: Jun 23, 2022 | 7:14 PM

राजकीय महाभारत क्षमलं पाहिजे. या अस्थीर व्यवस्थेमध्ये जे राज्याच्या जनतेचं नुकसान होतंय, राज्याच्या विकासाचं नुकसान होतंय ते थांबलं पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. महाविकास आघाडीचं सरकार काय राहण्याच्या दृष्टीकोनातून आमचं विचारमंथन झालेलं आहे.

Congress: गरज पडली तर बाहेरुन आघाडीला पाठिंबा देऊ, काँग्रेस बैठकीनंतर नाना पटोलेंची मोठी घोषणा
गरज पडली तर बाहेरुन आघाडीला पाठिंबा देऊ
Image Credit source: Tv9
Follow us on

मुंबई : राज्यात सुरु असलेल्या राजकीय नाट्याबाबत काँग्रेसची आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठक (Meeting) पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी नाना पटोलेंनी काँग्रेस महाविकास आघाडीसोबत राहणार असल्याचं ठामपणे सांगितलं. आज जी स्थिती झालीये. आम्हाला विरोधाचं मँडैट दिलं होतं. वेळ आली तर शिवसेनेने बाहेरुन पाठिंबा (Support) मागितला महाविकास आघाडीसाठी तरी आम्ही द्यायला तयार आहोत. पण काही गडबड झालीच त्यांच्याकडून तर आम्ही विरोधात बसायलाही तयार आहोत, ही भूमिका आम्ही सकाळीच मांडली आहे, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. तसेच महाविकास आघाडी 5 वर्षे पूर्ण करणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

काय म्हणाले नाना पटोले ?

राजकीय महाभारत क्षमलं पाहिजे. या अस्थीर व्यवस्थेमध्ये जे राज्याच्या जनतेचं नुकसान होतंय, राज्याच्या विकासाचं नुकसान होतंय ते थांबलं पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. महाविकास आघाडीचं सरकार काय राहण्याच्या दृष्टीकोनातून आमचं विचारमंथन झालेलं आहे. संजय राऊतांच्या वक्तव्याबाबतही चर्चा झाली. राऊतांचे वक्तव्य त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत बाबींवर आहे, महाविकास आघाडीबाबत नाही. भाजपने जो काही शिवसेनेत फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे, तो कसा थांबवता येईल त्याबाबतही चर्चा सुरु आहे. काँग्रेस मविआत आहे आणि राहणार.

भाजप अस्थिरता निर्माण करतंय

राज्यपाल कुणाचं ऐकतात हे सांगण्याची गरज नाही. भाजप अस्थिरता निर्माण करतंय. ज्यांनी महाराष्ट्रात सत्तासंघर्ष आणि अस्थिरता निर्माण केली, ते भाजप समोर का येत नाही ? त्यांच्याकडे अजूनही बहुमत नाही. त्यांना सत्तेची लालसा आहे. ईडीच्या माध्यमातून या पद्धतीने लोकशाहीचा खून करण्याचं काम करतंय. भाजपला आव्हान करतो की सरकार अल्पमतात असेल त्यांनी तसं आणावं. (Nana Patoles reaction to Mahavikas Aghadi and Shiv Sena after the Congress meeting)

हे सुद्धा वाचा