आंदोलनात आगीचा भडका, खासदार प्रतापराव चिखलीकरांची बोटं भाजली, नांदेडमध्ये काय घडलं?

| Updated on: Dec 17, 2022 | 3:30 PM

कार्यकर्ते नाराज होऊ नये म्हणून आजच्या सगळ्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहणार असे खासदारांनी स्पष्ट केलंय.

आंदोलनात आगीचा भडका, खासदार प्रतापराव चिखलीकरांची बोटं भाजली, नांदेडमध्ये काय घडलं?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नांदेड: महाराष्ट्रात (Maharashtra) आजचा दिवस आंदोलनांनी (Protest) गाजला. मुंबईत महाविकास आघाडीचा विराट ऐतिहासिक मोर्चा निघाला तर राज्यभरात भाजपच्या वतीने पाकिस्तानविरोधात आंदोलन करण्यात आलं. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. त्याचे पडसाद राज्यभरात उमटले. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये भाजपने याविरोधात आंदोलन केलं.

नांदेडमध्ये वझिराबाद परिसरात खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात टीका करणाऱ्या पाकिस्तानच्या बिलावल भुट्टो यांचा नांदेडमध्ये भाजपकडून पुतळा जाळण्यात आला. यावेळी पुतळा जाळताना आगीचा भडका उडाल्याने खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा हात थोडासा भाजल्या गेला..

माध्यमांचे कॅमेरे सुरु असल्याने ही घटना रेकॉर्ड झाली. नांदेडमध्ये आज भाजप कार्यकर्त्यानी मोठ्या संख्येने एकत्र येत पाकिस्तानचा निषेध केला. त्यावेळी पुतळा जाळताना ही घटना घडली.
पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यासाठी स्वतः खासदारांनी आग लावली.

त्यावेळी आगीचा भडका उडाल्याने ही घटना घडली. उपस्थित कार्यकर्त्यानी प्रसंगावधान राखत आगीचा भडका तातडीने विझवला. या घटनेत खासदार प्रताप चिखलीकर यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली.
आगीच्या या भडक्यात हाथाची तीन ते चार बोट भाजली आहेत. त्यावर खासदारांनी उपचार घेतला. डॉक्टरांनी माझ्यावर प्राथमिक औषधोपचार केला अशी प्रतिक्रिया खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली.
औषधोपचार घेऊन चिखलीकर आजच्या नियोजीत कार्यक्रमाला गेले आहेत. कार्यकर्ते नाराज होऊ नये म्हणून आजच्या सगळ्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहणार असे खासदारांनी स्पष्ट केलंय.