Rajyasabha Election : सुहास कांदेंनी नेमकं काय केलतं? ज्यामुळे थेट मतच बाद झालं, शिवसेनेला एका मताचा झटका

| Updated on: Jun 11, 2022 | 1:44 AM

यात नांदगावचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत बाद झाल्याचे उघड झाले. ज्यामुळे शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारची धाकधुक वाढली आहे.

Rajyasabha Election : सुहास कांदेंनी नेमकं काय केलतं? ज्यामुळे थेट मतच बाद झालं, शिवसेनेला एका मताचा झटका
शिवसेनेचे आमदार सुहास कांदे
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : राज्याचे राजकारण आज पावसातही तापलं. राज्यसभा निवडणुकीवरून (Rajya Sabha Election 2022) सकाळपासूनच आमदार मुंबईत आणि विधानभवानात दाखल होते. आणि आपलाच उमेदवार विजयी होणार हे सांगत होते. आज राज्यसभा निवडणुकीची जोरदार रस्सी खेच होताना दिसली. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांपैकी पाच जागांवर चित्र हे आधीच स्पष्ट झाले असून फक्त एकाच जागेसाठी इतक राजकारण सुरू आहे. या जागेवर कोल्हापूरचेच शिवसेनेचे उमेदवार संजय पवार (Sanjay Pawar) आणि भाजपचे धनंजय महाडिक हे चेहरे देण्यात आले आहेत. त्यामुळे सहाव्या जागेसाठी चुरस वाढली आहे. यादरम्यान राज्यातील 285 आमदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बाजावला मात्र रात्री 1 वाजता सुरू झालेल्या मतमोजणीनंतर शिवसेनेला धक्का लागल्याचे समोर आले. यात नांदगावचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (Shiv Sena MLA Suhas Kande) यांचे मत बाद झाल्याचे उघड झाले. ज्यामुळे शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारची धाकधुक वाढली आहे.

भाजपचं हे छडयंत्र हाणून पडेल : कांदे

मतदान बाद झाल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेचे आमदार कांदे यांनी, माझं मत बाद झालं तरी मला खात्री आहे की आमचे दोन्ही उमेदवार निवडून येतील ही पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच भाजपचं हे छडयंत्र हाणून पडेल. मी पक्षांच्या वरीष्ठांशी चर्चा करून न्यायालयात जायचं की नाही ते ठरवेन असं आमदार कांदे यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

 

सुहास कांदेंवरचे आक्षेप

राज्यसभा निवडणुकीत मतदानावेळी काही नियम असतात ते शिवसेनेचे आमदार कांदे यांनी पाळले नसल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. तर त्यांच्यावर, मतदारानं मतप्रत्रिकेची घडी घालणं गरजेचं असताना ती त्यांनी घातली नाही. असा आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच कांदेंनी आपल्या पक्षाच्या प्रतिनिधीला मतदान कक्षाच्या बाहेरुन मतपत्रिका दाखवली. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना मतदान कक्षात जाण्यास सांगितलं, असं सांगण्यात येत आहे.