नंदुरबार : “मी विकासाची कामं घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. जनतेने मला आशिर्वाद दिले. जनतेचे मी आभारी आहे. मला पहिल्यापासूनच विश्वास होता, मी विजयी होणार, जनता मलाच आशिर्वाद देणार”, असं भाजपच्या विजयी उमेदवार सुप्रिया गावित म्हणाल्या. सुप्रिया गावित यांनी कोळदा जिल्हा परिषद गटात विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेच्या उमदेवाराचा पराभव केला. त्यानंतर टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी विजयी होण्याचा विश्वास होता असं सांगितलं.
सुप्रिया गावित या भाजप नेते आणि माजी मंत्री विजयकुमार गावित यांची मुलगी तर भाजप खासदार हीना गावित यांची लहान बहीण आहे.
या विजयानंतर खासदार हीना गावित म्हणाल्या, “माझी जबाबदारी आणखी वाढली, माझी लहान बहीण जिंकली, मतदारसंघाचा विकास करताना या भागाचा विकास जबाबदारी आहे. सगळ्यांच्या मतदारसंघातील विकास मला जोमाने करावा लागणार आहे, मागच्या निवडणुकीत ११ पैकी ७ जिंकून आले होते, यावेळी तो आकडा क्रॉस करु” असा विश्वास हीना गावित यांनी व्यक्त केला.
तर माजी मंत्री विजयकुमार गावित म्हणाले, “या जिल्ह्यात आम्ही विकास करतोय, त्यामुळे जनतेचा विश्वास आहे. जिल्हा परिषदेत सर्व ५ आणि पंचायत समितीतही ५ उमेदवार निवडून येतील”
गावितांच्या घरात किती पदं?
भाजपा खासदार हिना गावितांची आदिवासी विकास मंत्री के.सी पाडवींवर टीका, सगळे मतदारसंघ सगळी ताकद खापर जिल्हा परिषद गटात लावली, म्हणून के सी पाडवी यांची बहीण विजयी झाली. खापर जिल्हा परिषद गटात भाजपा जिल्हाध्यक्षांचा गीता पाडवींनी केला पराभव. खापर जिल्हा परिषदेत काँग्रेसचा झेंडा. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आदिवासी विकास मंत्री के.सी पाडवींची बहिण गीता पाडवी विजयी
राज्यात जिल्हा परिषद आणि पोटनिवडणुकांसाठी मतदान पार पडलं आहे. धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सत्ता मिळवण्यासा भाजपला केवळ 2 जागांची गरज आहे. गुजरात भाजप प्रदेशाध्यक्षांची कन्या जिल्हा परिषद निवडणुकीत धरती देवरे या लामकने गटातून विजयी झाल्या आहेत. धरती देवरे लामकने गटातून भाजप कडून निवडणूक लढवत होते. धरती देवरे या गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्या कन्या आहेत. गेल्या वेळेस धरती देवरे बिनविरोध विजयी झाल्या होत्या.
VIDEO :
संबंधित बातम्या