मुंबई : केंद्रीय सुक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी (Angioplasty) करण्यात आली आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) ही शस्त्रक्रिया पार पडली. सध्या नारायण राणे यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत रूग्णालयाकडून माहिती देण्यात आली आहे.
केंद्रीय सुक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली.
नारायण राणे यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. नारायण राणे रुटीन चेकअपसाठी लिलावती रुग्णालयात गेले होते. यावेळी त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या शिरांमध्ये ब्लॉक असल्याचं दिसलं डॉक्टरांनी सांगितलं. त्यांची प्रकृती पाहता डॉक्टरांनी त्यांना अॅन्जिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार आज त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. अॅन्जिओप्लास्टीनंतर आता त्यांना आणखी तीन चे चार दिवस रुग्णालयात ठेवलं जाणार असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. नारायण राणे त्यांची प्रकृती स्थिर असून सध्या त्यांना कोणताही त्रास होत नाही.
नारायण राणे यांना दोन स्टेंट्सची म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमण्या आणि रक्तवाहिन्या दाबल्या जाऊ नये म्हणून बसवला जाणाऱ्या जाळीसारख्या छोटा गोलाकार तुकड्याची गरज आहे. अॅन्जिओप्लास्टी करून ती बसवण्यात आली. यात स्टेंट बसवण्यात आलं, तर दुसरा स्टेंट नंतर बसवण्यात येणार आहे, अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.
नारायण राणेंवर याआधीही अॅन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे. 2009 मध्ये रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे नारायण राणेंच्या छातीत दुखत होतं. त्यावेळी त्यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी करण्यात आली होती. ती शस्त्रक्रिया देखील लिलावती रुग्णालयातच करण्यात आली होती.