नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील अटकेची कारवाई आणि मिळालेला जामीन यावरुन मागील चार दिवसांपासून जोरदार राजकारण सुरु आहे. राज्यात सध्या शिवसेना विरुद्ध भाजप असं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील या राजकीय चित्रावरुन रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जोरदार टोलेबाजी केलीय. भाजप आणि शिवसेनेच्या भांडणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन कोल्हे मजा बघत आहेत, असा टोला सदाभाऊ यांनी लगावलाय. (Sadabhau Khot criticizes Congress and NCP over Narayan Rane and ShivSena dispute)
दोघांच्या भांडणात दुसराच कोल्हा स्वत:चे हित साधत आहे. भाजप-सेना एकत्र येऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोपही यावेळी खोतांनी केलाय. शरद पवार यांनी तर बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याची तयारी केली होती, अशी खोचक टीकाही खोत यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर केलीय. तसंच अनिल परब यांसारख्या बुद्धिजिवी माणसानं असं करणं योग्य नाही. आग भडकवण्यासाठी, भाजप शिवसेनेत दरी वाढवण्याचे काहींचे प्रयत्न सुरु आहेत, असा आरोपही खोत यांनी केलाय. महाराष्ट्रात यापूर्वी अनेक वक्तव्य केली गेली. मात्र, कधी दंगल झाली नाही. सरकार पुरस्कृत गोंधळ घातला गेला. राज्यातील जनतेचे प्रश्न बाजूला ठेवून वेगळे प्रश्न तयार करण्याची ही सुरुवात आहे. ही एकप्रकारची खेळी असल्याचा आरोपही खोत यांनी केला आहे.
राज्यात टोमॅटोचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान होत आहे. त्यावरुन सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय. टोमॅटोचे भाव खूप कोसळले आहेत. वाहतूकही परवडत नाही. सरकारनं ठरवावं आणि भाव द्यावा. निव्वळ घोषणांचा पाऊस पाडू नये. राज्य सरकारनं सर्कस बनू नये आणि शेतकऱ्यांसमोर विदूषक म्हणून नाचू नये. शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास भाग पाडू नका. तुम्हाला फायटर म्हणून पाठवलं नाही, प्रश्न सोडवण्यासाठी पाठवलं आहे. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजाराची तात्काळ मदत द्या. सरकारनं लक्ष दिलं नाही तर आंदोलन करु, असा इशाराही सदाभाऊ खोत यांनी यावेळी दिलाय.
नारायण राणे यांच्या नेतृत्वात सुरु झालेली जन-आशीर्वाद यात्रा उद्यापासून पुन्हा त्याच उत्साहाने सुरु करणार असल्याची घोषणा खुद्द नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केलीय. त्यानंतर आता शिवसेनेनं जर जन-आशीर्वाद यात्रेला विरोध केला तर जशास तसं उत्तर देणार, असा इशारा कोकण जन-आशीर्वाद यात्रेचे प्रमुख आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिलाय.
नारायण राणे यांच्या अटकेसाठी आलेले पोलीस दरवाजा तोडण्याची धमकी देत होते. मोगलाई सुरु आहे. म्हणून मी यांची तुलना औरंगजेबाशी केली. संभाजी महाराजांची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही. राजन साळवी यांना इतिहासाचं ज्ञान नाही. पॅसिफिक महासागरातील बेटावरुन त्यांनी डॉक्टरेट ही पदवी आणली आहे. कुणीतरी त्यांना भडकवलं आहे. असं करा नाहीतर पुढच्यावेळी तुम्हाला तिकीट नाही. आणि त्याची लस इकडे लागवी म्हणून वैभव नाईकांना सांगितलं तुम्ही नाही बोललं तर तुम्हाला तिकीट मिळणार नाही. हे दोघेही दु:खी आत्मे आहेत. अशा शब्दात प्रमोद जठार यांनी टीका केलीय.
इतर बातम्या :
भाजपच्या पोकळ धमक्यांना राज्यातील कुठलाही नेता घाबरत नाही; नवाब मलिकांनी सुनावले
करारा जवाब मिलेगा पर तारीख नही बताऐंगे, नितेश राणेंचा शिवसेनेला धमकीवजा इशारा
Sadabhau Khot criticizes Congress and NCP over Narayan Rane and ShivSena dispute