रत्नागिरी : भाजप खासदार नारायण राणे यांना टोला लगावलेल्या शिवसेना खासदार विनायक राऊत यांना राणे समर्थकांनी इशारा दिलाय. आमच्या नेत्याचं शिक्षण काढू नका, आमच्या वाटेला जाल तर याद राखा, अशा शब्दात राणे समर्थकांना विनायक राऊतांना इशारा दिला आहे. ‘मोठ्या भारत देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंसारख्या एका नॉन मॅट्रिक माणसाला मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर ते सिंधुदुर्गाचं दुर्दैव असेल, अशी बोचरी टीका विनायक राऊतांनी केली होती. त्यावरुन राणे समर्थकांनी विनायक राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला.(Narayan Rane supporters warn MP Vinayak Raut)
9 फेब्रुवारी रोजी खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली होती. राणेंसारख्या नॉन मॅट्रिक माणसाला मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर ते सिंधुदुर्गाचं दुर्दैव असेल. बुडत्याला काडीचा आधार. अशा शब्दात राऊतांनी राणेंना टोला हाणला होता. यावरुन राणे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी विनायक राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. इतकच नाही तर आमच्या वाटेला जाल तर याद राखा, असा इशाराही भाजप कार्यकर्त्यांनी विनायक राऊत यांना दिला आहे.
“राणेंच्या हॉस्पिटलला शिवसेनेने कदापिही खो घालण्याचा प्रयत्न केला नाही, उलट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जेव्हा फाईल आली, तेव्हा तातडीने मंजुरी देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं. जो प्रस्ताव रखडला होता तो राणेंच्या कंगालपणामुळे” असा निशाणाही विनायक राऊत यांनी राणेंवर साधला होता.
“शाह-राणेंची युती लाईफ टाईम टिको”
“नारायण राणे आणि अमित शाह यांच्यासारख्या समविचारी लोकांची युती झाली असेल. ही युती लाईफटाईम टिको अशी अपेक्षा आहे. भाजपकडून खोटारडेपणाचं राजकारण सुरु आहे. केंद्रात जी सत्ता आली आहे ती निष्ठूरपणे राबवायची हा त्यांचा एकमेव धंदा आहे. जो विरोधात गेला त्याच्या पाठी ईडी लावायची” अशी टीकाही राऊतांनी केली होती.
संबंधित बातम्या :
राणेंनी उद्धव ठाकरेंना एकदा नाही, तीनदा फोन केला, राऊतांचा दावा
Narayan Rane supporters warn MP Vinayak Raut