एका अहंकारी तरुणाने कॅबिनेटचा निर्णय फाडला… ही कोणती व्यवस्था; नरेंद्र मोदी यांचा संताप

| Updated on: Dec 14, 2024 | 7:38 PM

अलिपूर रोडला बाबासाहेबांचं स्मारक आहे. वाजपेयींच्या सरकारने हे स्मारक बनवण्याचा निर्णय घेतला. १० वर्ष यूपीएचं सरकार होतं. त्यांनी हे काम केलं नाही. होऊ दिलं नाही. पण आमचं सरकार आलं आणि आम्ही ते काम केलं. अलिपूर रोडवर आम्ही बाबासाहेबांचं मेमोरियल बनवलं असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले

एका अहंकारी तरुणाने कॅबिनेटचा निर्णय फाडला... ही कोणती व्यवस्था; नरेंद्र मोदी यांचा संताप
Follow us on

लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या गेल्या ७५ वर्षांच्या कारभाराच्या अक्षरश: चिंधड्या उडविल्या. राहुल गांधी यांच्या संविधानावरील भाषणाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसने संविधानाचा कसा गैरवापर केला याचा पाढाच वाचला. त्यांनी राहुल गांधी यांच्या पणजोबा पासूनचे दाखले देत काँग्रेसच्या कारभारवर कोरडे ओढले. ते म्हणाले की शहाबानो प्रकरणात राजीव गांधी यांनी कट्टरपंथीयांपुढे माथा टेकला आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बदलला.

लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले की शहाबानो प्रकरणात संविधानात दुरुस्ती करून राजीव गांधी यांनी कट्टरपंथीयांपुढे माथा टेकला होता. तेव्हा देशाने काँग्रेस मतांसाठी काय करु शकते हे पाहीले. आता एक अहंकारी व्यक्ती आपल्याच सरकारचा अध्यादेश पत्रकारांसमोर फाडतो असे म्हणत राहुल गांधी यांच्यावर नरेंद्र मोदी यांनी जोरदार टीका केली.एक जण अध्यादेश कोर्टाचा आदेश न जुमानता संवैधानिक निर्णयाची ऐशीतैशी करतो.कारण त्यांना अहंकार झाला होता. ते संविधान मानत नव्हते. एक अहंकारी व्यक्ती कॅबिनेट निर्णय फाडतो आणि कॅबिनेट आपला निर्णय बदलते. ही कोणती व्यवस्था आहे असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

कारण त्यांच्या पोटात पाप होतं

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की मी जे काही सांगत आहे. ते संविधानाबाबत काय झालं ते सांगत आहे. त्यावेळच्या पात्रांबाबत काहींना अडचण असेल. पण माझ्या मनाचं काही सांगत नाही. मी संविधानाबाबत बोलत आहे. काँग्रेसने संविधानाचा नेहमीच अपमान केला. अनेक उदाहरणं आहेत. या देशातील कमी लोकांना माहीत असेल. ३५ ए ची सर्वांना माहीत आहे. संसदेत येत नव्हते. संसदेला अस्वीकार केला. भारताचा पहिला पूत्र संसद आहे. ३५ ए संसदेत न आणता देशावर लादला. ३५ ए नसता तर जम्मूकाश्मीरमध्ये जी हालत झाली ती झाली नसती. राष्ट्रपतीच्या माध्यमातून हे केलं. हा संसदेचा अधिकार होता. मनमानी करू शकत नव्हतं. त्यांच्याकडे बहुमत होतं. तरीही केलं नाही. कारण त्यांच्या पोटात पाप होतं असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.

आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर ४० वर्ष कागदावर होतं

आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर ४० वर्ष कागदावर होतं. आमच्या सरकारने बाबासाहेबांचं हे सेंटर तयार केलं. काँग्रेस सत्तेतून बाहेर गेल्यावरच बाबासाहेबांना भारतरत्न दिला गेला. बाबासाहेबांची जयंती आम्ही १०२ देशात साजरी केली. पण बाबासाहेबांची शताब्दी होती. तेव्हा मध्यप्रदेशातील महूमध्ये आम्ही स्मारक केलं. देशातील हे एकमेव सरकार होतं. तेही भाजपचं असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.

काँग्रेस गेली तेव्हा ओबीसींना आरक्षण मिळालं

भारत विकसित व्हावा असं बाबासाहेबांना वाटायचं. त्यांनी आरक्षण दिलं. पण मतांच्या राजकारणात अडकलेल्या लोकांनी धर्माच्या आधारे आरक्षण दिलं. त्यामुळे एससी, एसटी आणि ओबीसींचं सर्वात मोठं नुकसान झालं. आरक्षणाची कथा मोठी आहे. नेहरूंपासून राजीव गांधींपासून काँग्रेसच्या पंतप्रधानांनी आरक्षणाचा विरोध केला आहे. नेहरूंनीच आरक्षणाच्या विरोधात चिठ्ठ्या दिल्या आहेत. या लोकांनी आरक्षणाच्या विरोधात भाषण केलं होतं. बाबासाहेबांनी समता आणि संतुलित विकासासाठी आरक्षण आणलं. दशकांपासून मंडल कमिशनचा रिपोर्ट डब्ब्यात टाकला. जेव्हा काँग्रेस गेली तेव्हा कुठे ओबीसींना आरक्षण मिळालं. तोपर्यंत ओबीसींना आरक्षण मिळालं नव्हतं. तेव्हा आरक्षण मिळालं असतं तर अनेक मोठ्या पदांवर ओबीसी लोक दिसले असते असे पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले.