Narendra Modi PC नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षात पहिल्यांदाच पत्रकार परिषदेला हजेरी लावली. राजधानी दिल्लीत भाजपची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासह नरेंद्र मोदीही उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी पाच वर्षातील कार्याचा आढावा घेतला. जनतेने मन बनवलं आहे, पुन्हा एकदा मोदी सरकारच सत्तेत येणार असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. तर मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, एनडीएचं सरकार सत्तेत येईल, असा दावा अमित शाह यांनी व्यक्त केला.
भाजपच्या मुख्यालयात ही पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी प्रश्न विचारले पण सर्व प्रश्नांची उत्तरं भाजप अध्यक्ष अमित शाह यांनीच दिली. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पंतप्रधानांनीच द्यायला हवं असं नाही, मी उत्तरं देत आहे, असं अमित शाह म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्याचा प्रचार संपला आहे. शेवटच्या म्हणजेच सातव्या टप्प्यात रविवारी 19 मे रोजी पश्चिम बंगाल, मोदींच्या वाराणसीसह 59 जागांसाठी मतदान होत आहे. त्यापूर्वी भाजपने पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेतली.
एकीकडे भाजपची पत्रकार परिषद सुरु असताना, तिकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही पत्रकार परिषद घेतली. राहुल गांधींनी राफेलवरुन पुन्हा पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला.
पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया
पाच वर्षात देशाने मला साथ दिली, सर्व प्रसंगात देश एकजूट होऊन माझ्या पाठिशी राहिला. त्यामुळे मी जनतेला धन्यवाद देण्यासाठी आलो आहे, असं पंतप्रधान मोदींनी नमूद केलं. 2014 मध्ये 16 मे रोजी लोकसभेचा निकाल आला आणि 17 मे रोजी सट्टाबाजाराचं मोठं नुकसान झालं, त्यामुळे पहिल्याच दिवसापासून इमानदारीची सुरुवात झाली. भारत सर्वात मोठी लोकशाही हे जगासमोर सिद्ध झालं आहे. विश्वाला आपल्याला प्रभावित करायला हवं. जेव्हा सरकार सक्षम होते तेव्हा सर्व सण होतात आणि निवडणुका पण होतात. निवडणूक खूप छान आणि सकारात्मकरित्या झाली, असं मोदी म्हणाले.
2009 आणि 2014 मध्ये निवडणुकीदरम्यान आयपीएल देशाबाहेर हलवलं होतं. मात्र मजबूत सरकार असेल तर देशातच सर्वकाही होऊ शकतं. या निवडणुकीत आयपीएल देशातच झालं, रमजान सुरु आहे, परीक्षा झाल्या, सर्वकाही सुरळीत झालं, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
पुन्हा मोदी सरकार – अमित शाह
दरम्यान, यावेळी भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारच सत्तेत येईल असा दावा केला. 2014 मध्ये 120 लोकसभा ज्या आम्ही जिंकलो नव्हतो, त्यापैकी 80 जागा आम्ही यंदा जिंकू असा विश्वास आहे. 3000 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी एकही पैसे न घेता काम केलं. मोदींनी 142 जनसभा केल्या, 4 रोड शो केले. 7000 पेक्षा जास्त लाभार्थ्यांसोबत पंतप्रधानांनी चर्चा केली. 1 लाख 5 हजार किलो मीटर यात्रा पंतप्रधानांनी केली, अशी माहिती अमित शाहांनी दिली.
BJP chief Amit Shah: We’ll perform good in North-East, very good in West Bengal. We’ll do good in Odisha & there will be improvement in number of seats in all the states in the South. We’ll improve in Maharashtra also. pic.twitter.com/vkkGHMCMD3
— ANI (@ANI) May 17, 2019
[svt-event title=”निवडणूक छान आणि सकारात्मक झाली – मोदी” date=”17/05/2019,5:03PM” class=”svt-cd-green” ] भारत सर्वात मोठी लोकशाही हे जगासमोर सिद्ध. विश्वाला आपल्याला प्रभावित करायला हवं. जेव्हा सरकार सक्षम होते तेव्हा सर्व सण होतात आणि निवडणुका पण होतात. निवडणूक खूप छान आणि सकारात्मकरित्या झाली. [/svt-event]
[svt-event title=”पुन्हा आमचंच सरकार – मोदी” date=”17/05/2019,5:01PM” class=”svt-cd-green” ] देशातील जनतेने सरकार बनवण्याचं ठरवलं आहे, मला खात्री आहे की पूर्ण बहुमताने आमचं सरकार येणार – मोदी [/svt-event]
[svt-event title=”पहिल्याच दिवशी इमानदारीला सुरुवात – मोदी” date=”17/05/2019,4:59PM” class=”svt-cd-green” ] 2014 मध्ये 16 मे रोजी निकाल आला आणि 17 मे रोजी सट्टाबाजाराचं मोठं नुकसान झालं, त्यामुळे पहिल्याच दिवसापासून इमानदारीची सुरुवात झाली – मोदी [/svt-event]
[svt-event title=”धन्यवाद देण्यासाठी आलोय – मोदी” date=”17/05/2019,4:58PM” class=”svt-cd-green” ] पाच वर्षात देशाने मला साथ दिली, त्यामुळे मी जनतेला धन्यवाद देण्यासाठी आलो आहे – मोदी [/svt-event]
[svt-event title=”आयपीएल आणि निवडणुका एकत्र – मोदी” date=”17/05/2019,4:56PM” class=”svt-cd-green” ]
मजबूत सरकारमुळे सर्व सुरळीत – मोदी
2009 आणि 2014 मध्ये निवडणुकीदरम्यान आयपीएल बाहेर हलवलं होतं. मात्र मजबूत सरकार असेल तर देशातच सर्वकाही होऊ शकतं. या निवडणुकीत आयपीएल देशातच झालं, रमजान सुरु आहे, परीक्षा झाल्या, सर्वकाही सुरळीत झालं – पंतप्रधान मोदी https://t.co/VpKFCbhYJ7 pic.twitter.com/BzEPkVbBKW
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2019
[svt-event title=”मजबूत सरकारमुळे सर्व सुरळीत – मोदी” date=”17/05/2019,4:54PM” class=”svt-cd-green” ] 2009 आणि 2014 मध्ये निवडणुकीदरम्यान आयपीएल बाहेर हलवलं होतं. मात्र मजबूत सरकार असेल तर देशातच सर्वकाही होऊ शकतं. या निवडणुकीत आयपीएल देशातच झालं, रमजान सुरु आहे, परीक्षा झाल्या, सर्वकाही सुरळीत झालं – पंतप्रधान मोदी [/svt-event]
[svt-event title=”त्यापैकी 80 जागा जिंकू – अमित शाह” date=”17/05/2019,4:52PM” class=”svt-cd-green” ] 120 लोकसभा ज्या आम्ही 2014 मध्ये जिंकलो नव्हतो, पण यावेळी त्यापैकी 80 जागा आम्ही जिंकू असा विश्वास आहे. 3000 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी एकही पैसे न घेता काम केलं. मोदींनी 142 जनसभा केल्या, 4 रोड शो केले. 7000 पेक्षा जास्त लाभार्थ्यांसोबत पंतप्रधानांनी चर्चा केली. 1 लाख 5 हजार किलो मीटर यात्रा पंतप्रधानांनी केली. [/svt-event]
[svt-event title=”राहुल गांधी यांची पत्रकार परिषद” date=”17/05/2019,4:46PM” class=”svt-cd-green” ] देशवासियांना धन्यवाद. पंतप्रधान पत्रकार परिषद घेत आहेत हे बरं आहे. पंतप्रधानांची पत्रकार परिषद आहे पण मोदी न बोलता अमित शाह बोलत आहे. राफेलवर चर्चेसाठी पंतप्रधानांनी यावं, असं आव्हान राहुल गांधींनी दिलं. [/svt-event]
[svt-event title=”प्रत्येक क्षेत्रात विकास – अमित शाह” date=”17/05/2019,4:44PM” class=”svt-cd-green” ] प्रत्येक क्षेत्रात विकास झाला आहे. महिलांच्या विकासासाठी अनेक योजना मोदी सरकाराने राबवल्या. जनतेला मोदींवर विश्वास आहे की देश त्यांच्या हातात सुरक्षित आहे. आज आमच्याकडे 16 राज्यात सरकार आहे- अमित शाह [/svt-event]
[svt-event title=”जनता पुन्हा संधी देणार – अमित शहा ” date=”17/05/2019,4:37PM” class=”svt-cd-green” ] आज 5 वर्ष पूर्ण झालीत आम्हाला जनता पुन्हा संधी देईल हा आम्हाला विश्वास आहे. [/svt-event]
[svt-event title=”नव्या योजना राबवल्या- अमित शाह” date=”17/05/2019,4:36PM” class=”svt-cd-green” ] नरेंद्र मोदी सरकराने प्रत्येक 15 दिवसात नव्या योजना आणल्या. समाजातील प्रत्येक वर्गाला त्या योजनेचा लाभ मिळाला. एकूण 133 योजना सरकारने राबवल्या. [/svt-event]
[svt-event title=” फिर एक बार मोदी सरकार” date=”17/05/2019,4:35PM” class=”svt-cd-green” ] फिर एक बार मोदी सरकार भाजप अध्यक्ष अमित शाह म्हणाले, आम्हाला विश्वास आहे की पुन्हा एकदा देशात मोदी सरकार सत्तेत येईल. सरकारने केलेली कामं तळागाळापर्यंत पोहोचली आहेत. [/svt-event]