मुंबई : माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी आज (14 सप्टेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट ((Narendra Patil Meet Sharad Pawar) घेतली आहे. मुंबईतील सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी ही भेट झाली. नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेच्या तिकीटावर उदयनराजे भोसले यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीत ((Narendra Patil Meet Sharad Pawar) लढले होते. उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश (Udayanraje Bhosale BJP) केल्यामुळे राष्ट्रवादीकडून पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराची चाचपणी तर केली जात नाही ना असा प्रश्न सर्वजण उपस्थित करत आहेत.
नरेंद्र पाटील हे लोकसभा निवडणुकीवेळी भाजपमध्ये आले होते. त्यानंतर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. हातात शिवबंधन बांधल्यानंतर त्यांनी उदयनराजे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी नरेंद्र पाटील यांनी 4 लाखाहून अधिक मत घेतली होती. उदयनराजेंच्या भाजप प्रवेशानंतर नरेंद्र पाटील यांनी शरद पवारांची भेट (Narendra Patil Meet Sharad Pawar) घेतल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
आज (14 सप्टेंबर) सकाळी उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आज (14 सप्टेंबर) दुपारच्या वेळी नरेंद्र पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे.या भेटीनंतर टीव्ही 9 मराठीने नरेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी पोटनिवडणुकीत उदयनराजेंना पुन्हा आव्हान देण्याचं वृत्त नरेंद्र पाटलांनी फेटाळलं. तसेच पवारांच्या भेटीमागचे कारण स्पष्ट केले.
नुकतंच माथाडी कामगार कायद्याला 50 वर्षे पूर्ण झाली. माझे वडील कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांची जयंती येत्या 25 सप्टेंबरला नवी मुंबईत साजरी होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहे. शरद पवारांनी माझ्या वडिलांसोबत काम केले आहे.
अशाप्रकारे ज्या लोकांनी माथाडी कामगार चळवळ जवळून बघितली आहे, त्या लोकांची आम्ही एक व्हिडीओ क्लिप बनवणार आहोत. त्यासाठी मी त्यांना भेटलो आणि त्यावेळी पवारांशी फक्त व्हिडीओ रिकॉर्डिंगबाबत चर्चा झाली, असे स्पष्टीकरण नरेंद्र पाटील यांनी दिले.
तसेच उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाबाबत बोलताना ते म्हणाले, “साताऱ्यातील जनतेला परिवर्तन हवं होतं. तसेच साताऱ्यात अद्याप बराच विकास होणे गरजेचे आहे.”
दरम्यान पोटनिवडणुकीत उदयनराजेंविरोधात लढणार का? असा प्रश्न त्यांना विचारला होता. त्यावेळी नरेंद्र पाटील यांनी “अजून पोटनिवडणुका जाहीर होणे बाकी आहे. त्या जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकत्रित बसून याबाबतचा निर्णय घेतील आणि साताऱ्यात पोटनिवडणूक लढवणार हे ठरवतील. साताऱ्याची जागा ही शिवसेनेची आहे. मात्र मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल”, असे ते म्हणाले.