नाशिक : प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरु केली. नाशिक महापालिकेतील(Nasik NMC Election 2022) प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपचे तीन नगरसेवक तर शिवसेनेचा एक नगरसेवर आहे. प्रभाग क्र. 7 मधील ब, क, ड या तीन प्रभागांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर प्रभाग 7 अ मध्ये शिवसेनेचा नगरसेवक जिंकला आहे. मात्र, 2022 च्या प्रभाग रचनेतील बदलानुसार प्रभाग क्र. 7 ड हा प्रभागच रद्द झाला आहे. यामुळे आता प्रभाग क्र. 7 मध्ये अ, ब, क असे तीन प्रभाग असणार आहेत. यामुळे प्रभाग क्र 8 ड मधून विजयी झालेल्या भाजपच्या उमेदवाराचा पत्त कट झाला आहे.
प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपचे तीन नगरसेवक विजयी झाले आहे. प्रभाग क्रमांक 7 अ मध्ये शिवसेनेचे अजय बोरस्ते , प्रभाग क्रमांक 7 ब मध्ये भाजपच्या हिमगौरी आहेर, प्रभाग क्रमांक 7 क मध्ये भाजपच्या स्वाती भामरे तर प्रभांग क्रमांक 7 ड मध्ये भाजपचे योगेश हिरे नगरसेवर आहे.
नाशिक मध्ये एकूण 44 प्रभाग आहेत. या 44 प्रभागांचे मिळून नाशिक महापालिकेत एकूण 133 नगरसेवक आहेत. यापैकी 19 अनुसूचित जाती, 10 अनुसूचित जमाती, 104 खुल्या जागा तर 67 जागा या महिलांसाठी राखीव आहेत. प्रभाग क्रमांक 7 ची एकुण लोकसंख्या 35526 इतकी आहे. या पैकी अनुसूतीत जातीचे 7888 मतदार आहेत तर 7969 हे मतदार हे अनुसूचीत जमातीचे आहेत.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
मनसे | ||
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
इतर आणि अपक्ष |
व्याप्ती – फुले नगर, वडारवाडी, भराडवाडी, विदयुत नगर, गौंडवाडी, दत्त नगर परिसर, हमालवाडी, सि.डी.ओ. मेरी कार्यालये, श्री शरदचंद्र पवार मार्केट यार्ड, नामको हॉस्पिटल, समर्थ नगर, आदिवासी वसतीगृह, कर्ण नगर, अश्वमेध नगर, सप्तरंग सोसायटी. आर.टी.ओ कार्यालय तांबे मळा,
उत्तर – मखमलाबाद रोडवरील चंद्रकांत गॅस समोरील राजकमल होम सोल्युशन्स पासुन डी.पी.रस्त्याने पुर्वेकडे जाऊन दक्षिणेकडील भाग घेऊन, सुर्या रो हाऊस घेऊन, श्री समर्थ रो बंगलो पर्यंत, तेथुन पुढे गोपाळ किसन निवास घेऊन कॉलनी रस्त्याने पुर्वेकडे नयन रो हाऊस पावेतो, तेथुन पुढे उत्तरेकडे अथर्व रो हौसेस, घेऊन गुरुदर्शन हाऊसेस समोरील डी.पी. रस्त्याने पेठरोडवरील शिव पॅलेस पावेतो. तेथुन पुढे पेठरोडने दक्षिणेकडे जाऊन आरटीओ ऑफीस चौका पावेतो, तेथुन पुढे डा.पा.रस्त्याने दक्षिणेकडील भाग घेऊन पुर्वेकडे किशोर सूर्यवंशी मार्ग दत्त चौकापावेतो, तेथून पुढे दिंडोरीरोड वरील श्री छत्रपती शिवाजी चौका पर्यंत.
पूर्व – दिंडोरी रोडवरील श्री छत्रपती शिवाजी चौकापासुन दिंडोरी रस्त्याने दक्षिणेकडे जाऊन, पश्चिमेकडील भाग घेऊन भगर मील रस्ता व दिंडोरी रोडवरील महाबीर सोसायटी पावेतो.
दक्षिण – दिंडोरी रोड भगर मील रोड जंक्शन बरील महावीर सोयायटी पासुन भगर मील रस्त्याने पश्चिमेकडेजाऊन, उत्तरेकडील भाग घेऊन पेठ रोड वरील टाऊन स्क्वेअर/इमारती पावेतो, तेथुन पुढे पेठरोडने उत्तरेकडे फुले नगर तिन पुतळे चौकापावेतो, तेथुन पेठ रोड ओलांडुन दत्त नगर रस्त्याने, दत्त नगर उद्यान दक्षिण पूर्व कोप-यापर्यंत तेथुन कॉलनी रस्त्याने प्रितरंग बी इमारत पर्यंत (इमारत सोडुन), तेथुन पुढे कॉलनी रस्त्याने पश्चिमेकडे शशिकला निवास पर्यंत, तेथुन पुढे दक्षिणेकडे जाऊन सुकदेव अपार्टमेंट पर्यत (सुकदेव अपार्टमेंट सोडुन) तेथुन पुढे कॉलनी रस्त्याने पश्चिमेकडे बाजी बंगल्यापर्यंत. (बाजी बंगला सोडुन) तेथून पुढे उत्तरेकडे श्री कस्तुरे बंगला घेऊन माऊली सदन पर्वत, तेथुन पुढे उत्तरेकडे सदगुरु कृपा बंगला घेऊन कॅनाल पर्यंत तेथुन पुढे कालव्याच्या हदोने उत्तरेकडील भाग घेऊन पश्चिमेकड मखमलाबादपा (नाशिक स.१.६१.
पश्चिम : मखमलाबाद रोड केनाल गंक्शन पासून (नाशिक स.न.६९) पालुन मखमलाबाद रोडने उत्तरेकडे जाऊन पुर्वेकडोल भाग बैऊन चंद्रकीन गंस स्मोरील राजकमल होम सोल्युशन्स पर्यंत.
प्रभाग क्रमांक 7 अ -अजय बोरस्ते (शिवसेना) – सनशाईन अपार्टमेंट पंडीत कॉलनी गंगापूररोड
प्रभाग क्रमांक 7 ब हिमगौरी आहेर (भाजप) – गिरिजा व्हिला पंपींग स्टेशन गंगापूररोड
प्रभाग क्रमांक 7 क – स्वाती भामरे (भाजप) – 201/लिबर्टी हार्मोनी सौभाग्य नगर गंगापूररोड
प्रभाग क्रमांक 7 ड योगेश हिरे (भाजप) – अस्मिता अपार्टमेंट शंकर नगर सावरकर नगर
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
मनसे | ||
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
इतर आणि अपक्ष |
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
मनसे | ||
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
इतर आणि अपक्ष |
सार्वत्रिक निवडणूक 2022 करिता अंतिम प्रभाग रचनेत आरक्षणाबाबत प्रभाग निहाय बदल करण्यात आले आहेत. नवीन प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रमांक सात मधून एका नगरसेवकाची संख्या कमी झाली आहे. प्रभाग क्रमांक 7 मध्ये आता प्रभाग क्रमांक 7 अ, प्रभाग क्रमांक 7 ब आणि प्रभाग क्रमांक 7 क अशा तीन नगरसेवकांना संधी मिळणार आहे. यापैकी प्रभाग क्रमांक 7 अ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आला आहे. तर आणि प्रभाग क्रमांक 7 ब हा अनुसूचित जमातीतील महिलांसाठी आरक्षित करण्यात आला आहे. तर प्रभाग क्रमांक 7 क हा सर्वसाधारण गटासाठी खुला असणार आहे. प्रभाग क्र. 7 ड हा रद्द झाला आहे. यामुळे प्रभाग क्रमांक सात मध्ये भाजपचा एक नगरसेवक कमी झाला आहे.