नाशिक : महानगर पालिकांच्या निवडणुकांच्या (Municipal election) रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. शासन आणि प्रशासन दोन्हीही या निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) प्रयोग एकीकडे झाला. त्यानंतर आता भाजपा आणि शिंदे गटाचे सरकार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर वेगवेगळी समीकरणे पाहायला मिळणार आहेत. नाशिक महापालिका (Nasik NMC Election 2022) वॉर्ड क्रमांक 11मध्येदेखील यावेळी वेगळे चित्र पाहायला मिळणार आहे. मागील वेळी चार सदस्यीय प्रभागरचना होती. यावेळी ती तीन प्रभागांमध्ये बदलण्यात आली आहे. 44 प्रभागांतील एकूण 133 जागांसाठी निवडणूक होत आहे. प्रभाग 11च्या चार सदस्यीय पॅनलमध्ये मागील वेळी रिपाइं, शिवसेना यांनी यश मिळवले होते. तर मनसेनेदेखील दोन ठिकाणी विजय मिळवला होता. यावेळी कोण बाजी मारणार, याची उत्सुकता असणार आहे.
नाशिक महापालिकेतील प्रभाग 11 हा गंगापूर आनंदवलीचा परिसर आहे. यात गंगापूर गाव, आनंदवली, काळेनगर, संत कबीर नगर, सिरीन मिडोज, बळवंत नगर, सोमेश्वर परिसर, सद्गुरू नगर त्याचप्रमाणे सोमेश्वर कॉलनी आदी परिसर येतो.
प्रभाग 11मधील एकूण लोकसंख्या 30,080 एवढी आहे. यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 5,696 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 3,168 एवढी आहे. शेवटची जनगणना ही 2011साली झाली होती. त्यामुळे त्यात 10 टक्के अतिरिक्त संख्या गृहीत धरण्यात आली आहे.
अल्पसंख्याकांची मते या मतदारसंघात निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे कोण बाजी मारणार याची उत्सुकता असणार आहे. मागील वेळी चार सदस्यीय प्रभागामध्ये रिपाइं, मनसे आणि शिवसेना यांनी यश मिळवले होते. त्यामुळे यावेळी तिरंगी विजय असेल की आणखी काही वेगळे समीकरण आणि विजय पाहायला मिळणार हे रंजक असणार आहे.
वॉर्ड | विजयी उमेदवार | पक्ष |
---|---|---|
11 (अ) | लोंढे दीक्षा दीपक | रिपाइं |
11 (ब) | शेवरे योगेश किरण | मनसे |
11 (क) | शेख सलिम इस्माईल | मनसे |
11 (ड) | निगळ सीमा गोकुळ | शिवसेना |
प्रभाग 11 अ हा अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी राखीव असणार आहे. 11 ब हा अनुसूचित जमातीच्या महिला उमेदवारासाठी तर क हा सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी राखीव असणार आहे.