नाशिक : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.’भावी मुख्यमंत्री’ आदित्य ठाकरे यांचे ठाकरे गटाच्या नेत्यांनी बॅनर लावलेत. त्यावरून नितेश राणे यांनी टीका केली आहे. शिल्लक सेनेत आदित्य ठाकरे सरपंच तरी होईल का?, हा विचार करून बॅनर लावावेत, असं नितेश राणे म्हणालेत.
त्र्यंबकेश्वर मंदिरातील महाद्वारासमोर धूप दाखविण्याचं प्रकरण समोर आलं. त्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मंदिरात जात महाआरती करणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्रंबकेश्वर मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नितेश राणेंच्या दौऱ्या पूर्वी त्रंबकेश्वरमध्ये मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. तिथे बोलताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केलीय.
संजय राऊत टेबल पत्रकार आहेत. त्यांना किती माहिती आहे, याची मला शंका आहे. नवीन संसद इमारतीला तेव्हाच सगळ्यांनी मान्यता दिली आहे. तुझ्या मालकाने नवीन मातोश्री का बांधली? देशासाठी नवीन इमारत बांधली आहे. अडीच वर्षाच्या काळात बाळासाहेबांचे स्मारक तरी बांधू शकले का बाळासाहेबांनी सांगितलं आहे की, काँग्रेस समोर झुकणारे हिXX असतात. मग आता तुम्ही काय करताय?, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केलाय.
मी काय राज ठाकरे यांना क्रॉस करणार नाही. तिथे स्पष्ट लिहिलं आहे की, हिंदू शिवाय इतरांना परवानगी नाही. त्यामुळे कुणी ढवळाढवळ करू नये. आमचा आजचा दौरा गावकऱ्यांच्या इच्छेनुसार लागला आहे. ज्यांचा विरोध आहे, त्यांनी सोबत यावं आणि भूमिका मांडावी, असं नितेश राणे म्हणालेत.
मी त्र्यंबकेश्वर मंदिरात आरती करायला चाललो आहे. धर्मामध्ये आरती करणं, आमची जबाबदारी आहे. हक्क आहे. धर्मावर होणारे अन्याय आम्ही थांबवू शकले नाही तर आम्हाला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार नाही. म्हणून आम्ही त्या ठिकाणी महाआरती करणार आहे. तिकडे येणाऱ्यांच्या संख्येपेक्षा भावना महत्त्वाची आहे. हे आक्रमण हिंदू धर्माच्या विरोधात होत आहे. जे काही हल्ले आमच्या हिंदू धर्मावरती होत आहे ते थांबवण्यासाठी आणि संदेश देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जात आहोत, असं नितेश राणे म्हणालेत.