मुंबईः अब राजा का बेटा राजी नही बनेगा… काम करेल त्यालाच जनता निवडून देईल, अशा शब्दात शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांना आव्हान दिलंय. नाशिक विधान परिषद (MLC) पदवीधर मतदार संघ निवडणुकीतून त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाच्या वतीने त्या निवडणूक लढवतील, यावर शिक्कामोर्तब झालंय. लवकरच ठाकरे गटाच्या नेत्याकडून याविषयी अधिकृत घोषणा करण्यात येईल. निवडणूक अर्ज भरताना मला पक्षाच्या वतीने एबी फॉर्म मिळाला नव्हता. त्यामुळे मी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरल्याचं शुभांगी पाटील यांनी सांगितलं.
शिवसेनेने पाठिंबा दिलाय, त्याप्रमाणे महाविकास आघाडीनेही पाठिंबा दिला तर माझ्या कामाच्या बळावर मी राज्यातील पहिली महिला पदवीधर आमदार बनू शकते, अशी प्रतिक्रिया शुभांगी पाटील यांनी दिली.
पदवीधर उमेदवारांसाठी मी गेल्या अनेक वर्षांपासून लढा देतेय. तर 45 ते 50 हजार भावांना घेऊन मी आझाद मैदानावर 6 दिवस अन्न व जलत्याग आंदोलन केलंय. त्यामुळे माझ्या कामासाठी मला तरुण निवडून देतील, अशी प्रतिक्रिया शुभांगी पाटील यांनी दिली.