Rahul Gandhi : दिल्लीत नॅशनल हेराल्ड कार्यालयाला ईडीकडून टाळं, काँग्रेस मुख्यालयाजवळ पोलीस सुरक्षाही वाढवली

| Updated on: Aug 03, 2022 | 6:19 PM

काँग्रेसचं कार्यालय तसेच नॅशनल हेराल्डचं कार्यालय या दोन्ही ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. ईडीच्या पथकानं काल दिल्लीतील नॅशनल हेराल्डच्या कार्यालयात तपासणी केली. या प्रकरणी देशभरात 14 ठिकाणी चौकशी करण्यात आली.

Rahul Gandhi : दिल्लीत नॅशनल हेराल्ड कार्यालयाला ईडीकडून टाळं, काँग्रेस मुख्यालयाजवळ पोलीस सुरक्षाही वाढवली
दिल्लीत नॅशनल हेराल्ड कार्यालयाला ईडीकडून टाळं
Follow us on

नवी दिल्ली : दिल्लीत नॅशनल हेराल्डचं कार्यालय ईडीकडून सील (Office Seal) करण्यात आलंय. तसेच काँग्रेस मुख्यालयाजवळ पोलीस सुरक्षा (Police Security) वाढवण्यात आली आहे. काँग्रेस मुख्यालयाजवळील रोड ब्लॉकही करण्यात आला. यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशी झाली. काल ईडीच्या एका पथकानं नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर छापा टाकला होता. त्यावेळी अनेक कागदपत्रांची तपासणी करण्यात आली होती. काल दिवसभर ही तपासणी झाली. थोड्या वेळापूर्वी नॅशनल हेराल्डचं कार्यालय हे सील केलेलं आहे. या कार्यालयात आता कुणालाही प्रवेश नसणार आहे. चौकशी सुरू असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं होतं. शिवाय कार्यालयावर घुसण्याचा प्रयत्न केला होता.

देशात 14 ठिकाणी चौकशी

सोनिया गांधी, राहुल गांधी यांची चौकशी होतानाही देशात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन करून अटक करून घेतली होती. यामुळं काँग्रेसचं कार्यालय तसेच नॅशनल हेराल्डचं कार्यालय या दोन्ही ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. ईडीच्या पथकानं काल दिल्लीतील नॅशनल हेराल्डच्या कार्यालयात तपासणी केली. या प्रकरणी देशभरात 14 ठिकाणी चौकशी करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 29 नोव्हेंबर 1038 साली असोसीएट जर्नल लिमिटेडची (AJL) निर्मिती केली. याचा उद्देश वेगवेगळ्या भाषांमध्ये वर्तमानपत्र प्रकाशित करणे हा होता. त्या अंतर्गत इंग्रजीत नॅशनल हेरॉल्ड, हिंदीत नवजीवन आणि उर्दुत कौमी आवाज समाचार पत्र प्रकाशित झाले. या कंपनीला पाच हजार स्वातंत्र्य सैनिक सहकार्य करत होते. तेच याचे शेअर होल्डर होते. 90 च्या दशकात नॅशनल हेरॉल्डला नुकसान होऊ लागले. 2008 पर्यंत एजेएल 90 कोटी रुपयांचे कर्ज झाले. तेव्हापासून वर्तमानपत्र प्रकाशित करणे बंद झाले. त्यानंतर ही कंपनी प्रापर्टीच्या व्यवसायात उतरली.

कसा झाला वाद

2010 मध्ये AJLचे शेअरधारक होते. नुकसान झाल्याने शेअर यंग इंडिया लिमिटेडला (YIL) ट्रान्सफर करण्यात आले. यंग इंडिया लिमिटेडची स्थापना 2010 मध्ये झाली. त्यात काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी संचालक झाले. कंपनी 76 टक्के भागिदारी राहुल गांधी आणि त्यांची आई सोनिया गांधी यांच्याकडं ठेवण्यात आली. उर्वरित 24 टक्के भागिदारी मोतीलाल वोरा व ऑस्कर फर्नांडीस (दोघांचेही निधन झाले) यांच्याकडं होती.