मुंबई : आज गुजरात (Gujarat) आणि हिमाचलमधील (Himachal) या दोन राज्यातील विधानसभांचा निकाल सुरु आहे. निवडणुक आयोगाकडून अद्याप संपुर्ण निकाल स्पष्ट झालेला नाही. परंतु आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालानुसार अरविंद केजरीवाल यांच्या “आप” या पक्षाने गुजरात राज्यात 13 टक्के मतदान मिळवलं आहे. त्यामुळे आप या पक्षाला निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय पार्टीचा (National party) दर्जा मिळणार आहे. निवडणूक आयोगाकडून काही दिवसात त्याची घोषणा करण्यात येईल.
देशात निवडणूक आयोगाने या पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषित केलं आहे. त्यामध्ये कॉंग्रेस, भाजप, तृणमूल कॉंग्रेस, बीएसपी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, सीपीाआई, सीपीाआईएम आणि एमपीपी इत्यादी पक्षांना देशात राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषित केलं आहे. मागच्या काही वर्षांपासून आप या पक्षांशी अनेक जोडली आहेत. तसेच विविध राज्यात पक्षाचे मतदार वाढत आहेत.