नवी दिल्ली | 16 जुलै 2023 : 2024 ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने महायुती अर्थात NDA अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. अशातच सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे नेते ओम प्रकाश राजभर यांनी महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.
14 जुलैला राजभर यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती आहे. मागच्या काही दिवसांपासून ओम प्रकाश राजभर हे युतीत सामील होऊ शकतात अशी चर्चा होती. आज अखेर याची अधिकृत घोषणा झाली आहे.
ओम प्रकाश राजभर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला. एनडीए परिवारात मी त्यांचं स्वागत करतो. राजभरजी यांच्या येण्याने उत्तर प्रदेशमध्ये NDA बळकट होईल. मोदीजींच्या नेतृत्वाखाली NDA कडून गरीब आणि दलितांच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना आणखी बळ मिळेल, असं ट्विट अमित शाह यांनी केली आहे.
श्री @oprajbhar जी से दिल्ली में भेंट हुई और उन्होंने प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के नेतृत्व वाले NDA गठबंधन में आने का निर्णय लिया। मैं उनका NDA परिवार में स्वागत करता हूँ।
राजभर जी के आने से उत्तर प्रदेश में एनडीए को मजबूती मिलेगी और मोदी जी के नेतृत्व में एनडीए द्वारा… pic.twitter.com/uLnbgJedbF
— Amit Shah (@AmitShah) July 16, 2023
ओम प्रकाश राजभर हे सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशमधील जहूराबादमधून खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. तसंच 2017 ला ते जहूराबादमधूनच विधानसभेचे सदस्य अर्थात आमदार होते. ते योगी आदित्यनाथ सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत. 19 मार्च 2017 ला ते मागासवर्ग कल्याण विभाग आणि अपंग लोक विकास मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री होते. पण त्या काळात ओम प्रकाश राजभर यांच्यावर युती धर्म मोडल्याचा आरोप ठेवण्यात आला. 20 मे 2019 ला त्यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करण्यात आलं. मग 2022 ला त्यांना सपासोबत जात निवडणूक लढली होती.
2024 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील समाजवादी पार्टीला एका मागो माग एक धक्के बसत आहेत. आधी आमदार दारा सिंह चौहान यांनी काल (शनिवारी) यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आज आता ओम प्रकाश राजभर यांनी महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सपासाठी हा मोठा धक्का आहे.
ओम प्रकाश राजभर हे आधी युतीचाच भाग होते. शिवाय योगी आदित्यनाथ सरकारमध्ये ते मंत्री देखील राहिले आहेत. पण मध्यतंत्री त्यांना मंत्रिपदावरून बरखास्त करण्यात आल्यानंतर ओम प्रकाश राजभर यांनी सपाची हात मिळवणी केली. पण आता पुन्हा एकदा ते युतीत सामील झाले आहेत. त्यांची घरवापसी झालेली आहे.