‘या’ कारणासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात; संजय राऊत यांचं मोठं विधान

| Updated on: Aug 08, 2023 | 10:46 AM

Sanjay Raut on : Raj Thackeray Uddhav Thackeray : आता ठरलंय, NDA विरूद्ध INDIA, एनडीएचा सगळ्यात मोठा पराभव महाराष्ट्रात होणार; संजय राऊत यांना विश्वास

या कारणासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात; संजय राऊत यांचं मोठं विधान
Follow us on

नवी दिल्ली | 08 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा होतेय. राज्याच्या राजकारणातील सध्याच्या घडामोडी पाहता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवाय या दोघांच्या समर्थकांची ही तीव्र इच्छा आहे. तसं ती इच्छा बोलूनही दाखवली जात आहे. या सगळ्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे भाऊ आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी दोन्ही भाऊ एकत्र येऊ शकतात, असं संजय राऊत म्हणालेत.

माझे या दोघांशीही चांगले सबंध आहेत. त्या विषयावर दोघे बोलत असताना बाकी कुणी बोलायची गरज नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

NDA च्या महाराष्ट्रातील खासदारांची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पंतप्रधान क्लस्टर बैठका घेत आहेत. आज महाराष्ट्र आणि गोव्यातील 48 खासदारांची एकत्रित बैठक होणार आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात मिशन 45 चा नारा दिला आहे. त्यावर राऊतांनी भाष्य केलंय.

घेऊ द्या बैठका… बैठका घेतल्याने काही होत नाही. मूळ NDA आहे तरी कुठं? जे जुने सहकारी पक्ष होते ते आता त्यांच्यासोबत आहेत का ? आम्ही INDIA स्थापन केल्यावर तुम्हाला NDA ची आठवण आली. NDA चा सगळ्यात मोठा पराभव महाराष्ट्रात होणार, असा विश्वास संजय राऊत यांनी बोलून दाखवला.

लोकसभेत आज अविश्वास प्रस्ताव आला आहे त्यावर आजपासून चर्चा होणार आहे. आम्ही INDIA मणिपूर मधील परिस्तिथीवर पंतप्रधान यांनी संसदेत बोललं पाहिजे, अशी आमची मागणी आहे. माजी लष्कर प्रमुख देखील काळजी व्यक्त करत आहेत. पंतप्रधान यांच्या मन की बात संसदेत ऐकायची आहे. त्यासाठी हा अविश्वास ठराव आहे. राहुल गांधी या सगळ्या विषयावर काय बोलतात याकडे देशाचं लक्ष आहे, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.

मनमोहन सिंह यांनी काल संसदेच्या अधिवेशनाला हजेरी लावली. त्यावर ही लढाई आहे.यावर भाजपने बोलायची गरज नाही. संजय सिंह यांचा अभिमन्यू केला तरी आम्ही लढलो. महाराष्ट्रातील आता राज्यपाल आहेत कुठं? आमचं सरकार असताना ते बोलत होते.राज्यपाल तमिळनाडू, बंगाल मध्ये आहेत का? आम्हाला अपेक्षा होती तेवढी मत आम्हाला काल मिळाली आहेत. पण आम्ही बसून चर्चा करू, असंही ते म्हणाले.