प्रदिप कापसे, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली | 05 डिसेंबर 2023 : राजधानी दिल्लीत उद्या इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीआधी काही नेते नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट भाष्य केलं. आहे. उद्या दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक आहे. पाच राज्यातील निकालाच्या आधीच तारीख ठरली होती. या बैठकीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीत येत आहेत. महाराष्ट्रातील बाबत यावर चर्चा होईल, असं संजय राऊत म्हणाले. तसंच इंडिया आघाडीतील नाराजीवरही संजय राऊत यांनी भाष्य केलंय.
अखिलेश यादव नाराज आहेत हे मी वाचलं. नितीश कुमार यांची प्रकृती खरंच बिघडली आहे. ममता या पण नाराज आहे असल्याचं ऐकलं. पण आमच्या मित्रपक्षांचे समज गैरसमज लवकरच दूर होतील. काँग्रेसची भूमिका काय असावी यावर पण चर्चा होईल. उद्धव ठाकरे उद्या रात्री दिल्लीत मुक्कामी असतील, असंही राऊत म्हणाले.
उद्या दिल्लीत होणाऱ्या बैठकीला इंडिया आघाडीतील सगळे प्रमुख नेते राहणार उपस्थित राहणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्याची बैठक महत्त्वाची आहेत. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ही उपस्थित राहणार आहे. दोन दिवस असणार दिल्लीत उद्याच्या बैठकीकडे सगळ्याचं लक्ष आहे. इंडिया आघाडीत ममता बॅनर्जी नाराज आहेत का?, अशी चर्चा होतेय. उद्या नियोजित कार्यक्रमामुळे ममता बॅनर्जी दिल्लीत होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. ममता बॅनर्जीनी वेगळा वेळ मागितल्याचंही बोललं जात आहे.
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. त्यावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. बावनकुळे यांनी हे अजित पवार, भाजपने सांगायला पाहिजे. हे लग्न तिघात झालं आहे ते टिकत नसतं… हे दोघात व्हायला हवं होतं… आम्ही महविकास आघाडी म्हणून एकत्र होतो. पण आमचं चांगल सुरू होतं. भाजपचं काहीच नव्हतं तेव्हा त्यांना खांद्यावर घेऊन शिवसेनेने गावागावात पोहोचवलं. भाजप सुजला, फुगला, मोठा झाला हे कोनामुल हे सगळ्यांना माहित आहे शिवसेनेमुळे भाजप वाढली हे माहीत आहे, असं संजय राऊत म्हणाले.