नवी दिल्ली : राज्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पेनड्राईव्हवर पेनड्राईव्ह करत आहे. स्टिंग ऑपरेशन (Sting Operation)दाखवत आहेत. मागच्या वेळी पडणवीसांनी पेनड्राईव्ह बॉम्ब टाकत सरकारमधील मंत्र्यांना टार्गेट केलं. मंत्री आणि अधिकारी मिळून भाजप नेत्यांविरोधात कारस्थान रचत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला. त्यानंतर पुन्हा शुक्रवारी देवेंद्र फडणवीसांनी दुसरा पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला. आणि इसाक बागवान यांच्या भापाने केलेलं हे स्टिंग ऑपरेशन आहे, असे सांगत पुन्हा महाविकास आघाडीतील नेत्यांवर आरोप केले. राज्यात हा पॉलिटिकल राडा सुरू असतानाच दिल्लीतही यावरून राजकारण तापत आहे. आता दिल्लीच्या राजकारणातही पेनड्राईव्ह बॉम्बने एन्ट्री घेतलीय. अमरावीतच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनीही आज संसदेत पेनड्राईव्ह सादर करत आरोप केले आहेत. या आरोपांनी आज संसदेतही वातावरण तापल्याचे दिसून आले.
खासदार नवनीत राणा यानी एका प्रशासकीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आरती सिंह या महिला अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजेत, असे म्हणत नवनीत राणा संसदेत कडाडल्या आहेत. लोकसभा अध्यक्षांनी या पेनड्राईव्हची आणि आरोपांची दखल घेतली असल्याचा दावा नवनीत राणा यांनी केला आहे. या पेन ड्राइव आणि फोटोच्या माध्यमातून माझ्यावर झालेल्या अन्यायाचे मी पुरावे दिले, अशी माहिती यावेळी नवनीत राणा यांनी दिली आहे. आता या पेनड्राव्ह मध्ये नेमकं काय आहे? असा सवाल विचारला जात आहे. मात्र आणखी एका पेनड्राईव्हनं पुन्हा राजकारणात खळबळ माजवली आहे. एवढं मात्र नक्की.
खासदार नवनीत राणा या महाविकास आघाडीवर नेहमीच तुटून पडत असतात. अमरावतीत झालेल्या पुतळ्याचा वाद तर देशभर गाजला. पोलीस प्रशासनाचा गैरवापर महाविकास आघाडी करत असल्याचा सतत आरोप नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याकडून होत आहे. महापालिकेतील आयुक्तांवर शाहीपेकीचाही प्रकार घडला. याच प्रकरणात रवी राणा यांच्या अडचणीही वाढल्याचे दिसून आले. माझ्यावर चुकीच्या पद्धतीने मला अडकवण्याच्या उद्देशाने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असे रवी राणा सतत सांगत आहेत. खासदार नवनीत राणा याच प्रकरणावरून राज्य सरकारविरोधात पुन्हा आक्रमक झालेल्या दिसून आल्या होत्या. आणि आता पुन्हा नव्या अधिकाऱ्यावर नवनीत राणा यांनी आरोप केले आहेत.
जय पवार यांचा अभिनेत्रीसोबतचा फोटो व्हायरल, कोण आहे ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री?