अमरावती : नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यावर आता पुन्हा कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. अमरावतीत भजन कार्यक्रम करताना रवी राणा आणि नवनीत राणा यांनी नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप केला जातोय. रात्री दहा वाजल्यानंतरही भजनाचा भोंगा सुरु होता. त्यामुळे आता नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या भजन कार्यक्रम आयोजनावर कारवाई होण्याची शक्यताय. रात्री दहा नंतर लाऊड स्पीकर (Loudspeaker Row) लावण्यास कायद्यानं बंदी आहे. अशावेळी राणा दाम्पत्यानं नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस त्यांच्यावर आता काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. तब्बल 36 दिवसांनंतर अमरावतीमध्ये परतलेल्या राणा दाम्पत्याचं शनिवारी मोठ्या जोमात स्वागत करण्यात आलं होतं. त्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत त्यांच्या स्वागतासाठीचा कार्यक्रम सुरुच होता.
अमरावतीत आल्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांना दुग्धाभिषेक घालण्यात आला होता. जंगी कार्यक्रमाचं आयोजन अमरावतीत करण्यात आलं होतं. पाहा व्हिडीओ :
हनुमान चालिसेवरुन सरकारवर टीका करणाऱ्या नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या मुंबईतही कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. आता अमरावीतमध्ये त्यांच्यावर कारवाई होणार का, हे पाहणं महत्त्वाचंय. दरम्यान, राणा दाम्पत्य आणि भीम आर्मी यांच्यातही तगडा संघर्ष शनिवारी पाहायला मिळाला होता.
दिल्लीतून अमरावतीत परतलेलं राणा दाम्पत्य आणि भीम आर्मी आमनेसामने आले होते. दरम्यान, नवनीत राणा आणि रवी राणा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानं भीम आर्मीदेखील आक्रमक झाली. इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे गुलाब जलनं शुद्धीकरण करणार असल्याचं भीम आमीनं म्हटलंय. शनिवारी मोठा संघर्ष राणा दाम्पत्याचे समर्थक आणि भीम आर्मीत पाहायला मिळाला होता.
शनिवारी नवनीत राणा आणि रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राला लागलेले शनी आहेत, असं म्हणत नवनीत राणा यांनी निशाणा साधला होता. तर रवी राणा यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यतील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती.