‘आदित्य आणि उद्धव ठाकरेंनीच खोक्यांचं राजकारण सुरु केलं’, रवी राणा यांचा नवा दावा

| Updated on: Oct 26, 2022 | 4:30 PM

खासदार नवनीत राणा यांनी 'खोके' प्रकरणावर भाष्य केलंय. नवा दावा त्यांनी केला आहे.

आदित्य आणि उद्धव ठाकरेंनीच खोक्यांचं राजकारण सुरु केलं, रवी राणा यांचा नवा दावा
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात’खोके’ शब्दाला वेगळं स्थान मिळालं. शिवसेनेच्या ठाकरे गटासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खोके सरकार म्हणत शिंदे-फडणवीस सरकारला हिणवलं. शिंदेगटातील आमदारांना 50 खोके घेऊन बंडखोरी केल्याचा आरोप करण्यात आला. आता या सगळ्या खोके प्रकरणावर रवी राणा (ravi Rana) यांनी भाष्य केलंय. नवा दावा त्यांनी केला आहे.

रवी राणा काय म्हणाले?

खोके सरकार म्हणत हिणवणाऱ्या शिवसेनेच्या ठाकरे गटाला नवनीत राणा यांनी उत्तर दिलं आहे. खोक्यांचं राजकारण तर ठाकरेंनीच सुरु केलं असं राणा म्हणाल्या आहेत. आदित्य आणि उद्धव ठाकरेंनीच खोक्यांचं राजकारण सुरु केलं असल्याचं ते म्हणाल्या आहेत.

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मातोश्रीवर बसून मुंबई महानगरपालिकेत ‘खोक्याचं’ राजकारण सुरू केलं. किशोरी पेडणेकर महापौर असताना त्यांनी किती खोके मातोश्रीवर पोहचवले, हे संपूर्ण जनतेला माहिती आहे. खोक्यांशिवाय उद्धव ठाकरे यांचं पानही हलत नाही. खोक्याची प्रथा ही अदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सुरू केली आहे, असं राणा म्हणालेत.

बच्चू कडू यांच्या विधानावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोण काय अल्टीमेंटम देते याकडे माझं लक्ष नसतं. माझ्या विरोधात कोणी आंदोलन केलं याची मी पर्वा करत नाही, असं त्यांनी म्हटलंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा बोलवतील तेव्हा केव्हाही जाऊ माझा कोणाशी वाद नाही.मी सिद्धांताची लढाई लढते, असंही राणा म्हणालेत.