मुंबई – नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या लिलावती रूग्णालयात MRI वरून शिवसेना (Shivsena) आक्रमक झाली आहे. काल शिवसेनेच्या महापौरांनी कार्यकर्त्यांसोबत रूग्णालयात जाऊन तिथल्या प्रशासनाला जाब विचारला. सोमवारी समाधकारक उत्तर न मिळाल्याने शिवसेनेकडून आज पोलिस स्टेशन गाठलं आहे. MRI सुरू असताना तिथं लोकांनी फोटो कसे काय काढले. MRI सुरू असताना मोबाईल आणि धातू सारख्या वस्तू घेऊन जाण्यास परवानगी नसते. त्यामुळे लिलावती रूग्णालय प्रशासनाची भूमिका संशयास्पद आहे. भाजपच्या सोशल मीडियाला एवढी समज असायला हवी की, आमच्या नेत्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. पण ते हॉस्पिटलच्या प्रायव्हेट रूम मधील आहेत. एमआरआय लॅब मधील नाही आहेत अशी टीका राहूल कनाल (Rahul kanal) यांनी केली.
“काल आम्ही लिलावती हॉस्पिटल प्रशासनाला या प्रकरणा संदर्भात जाब विचारायला गेले होतो. हॉस्पिटलने एमआरआय लॅबमधील सीसीटीव्ही फुटेज आम्हाला दिले नाही. त्याचमुळे आज आम्ही बांद्रा पोलीस स्थानकामध्ये या सगळ्या प्रकरणा संदर्भात गुन्हा नोंदवावा या मागणी करता एक तक्रार अर्ज दिलेला आहे. हॉस्पिटलच्या मॅन्युअल मध्ये जे काही नियम आहेत. त्या नियमांचं उल्लंघन झालेलं आहे. एमआरआय लॅबमध्ये कोणतीही लोखंडी वस्तू घेऊन जाता येत नाही, त्यात नवनीत राणा यांचे एमआरआय करताना चे फोटो व्हायरल झालेले आहेत असं राहूल कनाल यांनी सांगितलं आहे.
आता भाजपच्या सोशल मिडिया कडून आमच्या नेत्यांचे देखील फोटो वायरल केले जात आहेत. परंतु भाजपच्या सोशल मीडियाला एवढी समज पाहिजे की, आमच्या नेत्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. ते हॉस्पिटलच्या प्रायव्हेट रूम मधील आहेत, ते एमआरआय लॅब मधील नाही आहेत. या सगळ्या प्रकरणा संदर्भात आज आम्ही बांद्रा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. तसेच युवा सेनेकडून संबंधित सर्व प्रकरणाची चौकशी करण्याकरता इंडियन मेडिकल कौन्सिलसोबत आम्ही पत्रव्यवहार करणार आहे.