“देवेंद्रजींनी एक लवंगी फटाका फोडला तर आदित्य आणि उद्धव ठाकरे जेलमध्ये जातील”

| Updated on: Dec 27, 2022 | 1:39 PM

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बॉम्बवरून दावे-प्रतिदावे करण्यात आले आहेत. या प्रकरणात आता खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी उडी घेतली आहे.

देवेंद्रजींनी एक लवंगी फटाका फोडला तर आदित्य आणि उद्धव ठाकरे जेलमध्ये जातील
Follow us on

नागपूर : महाराष्ट्रातील राजकारणात सध्या बॉम्ब वॉर सुरु आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून बॉम्बवरून दावे-प्रतिदावे करण्यात आले आहेत. या प्रकरणात आता खासदार नवनीत राणा आणि रवी राणा (Ravi Rana) यांनी उडी घेतली आहे. आम्ही जर बॉम्ब फोडला तर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे जेलमध्ये जातील, असं रवी राणा म्हणावेत.

आम्ही जर बॉम्ब फोडला तर संजय राऊत, उद्धव ठाकरे दिसणारही नाही, असंही रवी राणांनी म्हटलं आहे.

संजय राऊतांनी विदर्भात येऊन बॉम्ब फोडण्याची भाषा करू नये. त्यांचे आधीच 40 आमदार गेले हा बॉम्ब फुटला आहे. अडीच वर्षात काय काम केलं हे दाखवावं मी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना बक्षिस देईन, असं रवी राणा म्हणालेत.

खासदार नवनीत राणा यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीसांनी जरी लवंगी बॉम्ब फोडला तर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे दिसणार नाहीत. पण देवेंद्र फडणवीसांना कोणाचा बॉम्ब काढण्यात रस नाही. काम करताना प्रत्येकाकडून चुका होतात जर आम्ही सुरू केलं तर खूप भारी पडेल, नवनीत राणा म्हणाल्या.

विदर्भात काय कामं केली.हे संजय राऊतांनी सांगावं. त्यांनी जर काम सांगितली तर मी माझी सगळा पगार देईल, असं नवनीत राणा म्हणाल्यात.

देवेंद्र फडणवीस यांना या बॉम्ब फोडाफोडीमध्ये रस नाही.ते विदर्भाचा विकास कसा होईल ते पाहतात. विरोधी पक्षानं जे काही करायचं ते बाहेर येऊन करावं. जनतेने दिलेल्या पैशातून सभागृह चालतं. त्यात लोक हिताचे निर्णय व्हायला पाहिजेत, असं नवनीत राणा म्हणाल्यात.

सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात विविध मुद्द्यांवर चर्चा होतेय.याच दरम्यान शिवसेना ठाकरे गट आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बॉम्ब वॉर सुरु आहे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्याकडे बॉम्ब असल्याचं म्हटलं आणि हे बॉम्ब आपण लवकरच फोडणार असल्याचं म्हटलं. त्यावर ठाकरे गटाकडे बॉम्ब नव्हे तर लवंगी फटाके असल्याचं म्हटलं. त्यामुळे राज्याच्या राजकारणात बॉम्बची चर्चा होतेय. रवी राणा आणि नवनीत राणा यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.