गीता पठणात मुस्लिम मुलीचा प्रथम क्रमांक, कला-स्पर्धा-अभिनयाला धर्माचा रंग देऊ नका : नवाब मलिक

| Updated on: Nov 30, 2020 | 5:20 PM

शिक्षण-कला-स्पर्धा-अभिनयाला धर्माचा रंग देऊ नका, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला दिलं आहे.

गीता पठणात मुस्लिम मुलीचा प्रथम क्रमांक, कला-स्पर्धा-अभिनयाला धर्माचा रंग देऊ नका : नवाब मलिक
Follow us on

मुंबई :  शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सपकाळ यांनी मुस्लिम धर्मातील लहान मुलांना नमाजची गोडी लागावी म्हणून अजान पठण स्पर्धेचं आयोजन केलं आहे. शिवसेनेच्या भूमिकेवर भाजपने जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. अशात शिवसेनेची बाजू सावरण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी पुढाकार घेतला आहे. गीता पठणात मुस्लिम मुलीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. शिक्षण-कला-स्पर्धा-अभिनयाला धर्माचा रंग देऊ नका, असं प्रत्युत्तर मलिक यांनी भाजपला दिलं आहे. (Nawab Malik Answer BJP over Shivsena Azan Competition)

शिवसेनेने आयोजित केलेल्या अजान स्पर्धेवर भाजपने सडकून टीका केली आहे. सत्तेसाठी शिवसेनेची भूमिका बदलत आहे. शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व शिवसेना विसरत चालली आहे. शिवसेनेने आता फक्त हिरवा झेंडाच खांद्यावर घ्यायचा राहिला आहे, अशी जळजळीत टीका भाजपने केली. त्यावर बोलताना ‘भाजपला कोणत्याही गोष्टींमध्ये राजकारण करण्याची सवय लागलेली आहे. परंतु गीता पठणात मुस्लिम मुलीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे भाजपने कला, स्पर्धा, तसंच अभिनयाला धर्माचा रंग देऊ नये’, असं प्रत्युत्तर मलिक यांनी दिलं आहे.

“शिवसेनेने अजान स्पर्धा सुरु केलेली आहे. भाजपकडून त्यावर आक्षेप घेण्यात येतोय. मात्र सोलापूर आणि इतर ठिकाणी गीता पठण कार्यक्रमामध्ये मुस्लिम मुलींनी पहिला क्रमांक पटकावला आहे, ही देखील सत्य परिस्थिती आहे. देशामध्ये कलेला आणि अभिनयाला धर्माचा चष्मा लावणे अयोग्य आहे. दिलीप कुमार, शाहरुख खान, सलमान खान यांनी सिनेमेमध्ये जे रोल केले आहेत किंवा मंदिरामध्ये सीन केले आहेत त्याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी धर्मांतर केलंय. कलेला, अभिनयाला, स्पर्धेला धर्माचा चष्मा लावणे अयोग्य आहे हे भाजपला कळलं पाहिजे”, असं मलिक म्हणाले.

मराठा आरक्षणावर बोलताना त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. “मराठा आरक्षण देवेंद्र फडणवीसांच्या बोलण्यावरुन सुप्रीम कोर्टाने दिलं असतं तर देवेंद्र फडणवीसांनी नरेंद्र मोदींजवळ आग्रह धरला पाहिजे आणि निकाल मराठा समाजाच्या बाजूने लावून घ्या. एखादा विषय विषय न्यायालयात असताना सरकारच्या हातात गोष्टी नसतं हे लोकांना कळतं”, असंही मलिक म्हणाले.

(Nawab Malik Answer BJP over Shivsena Azan Competition)

संबंधित बातम्या

लहान मुलांसाठी शिवसेनेची अजान स्पर्धा; अजानला विरोध करणं गैर: पांडुरंग सकपाळ

शिवसेनेने आता फक्त हिरवा झेंडाच खांद्यावर घेणं बाकी आहे; भाजपची खोचक टीका

बाळासाहेबांनी नमाजासंदर्भात भोंग्यांवरुन घेतलेली भूमिका देशवासीयांना माहिती, दरेकरांची अजान स्पर्धेवर टीका