Nawab Malik : नवाब मलिक तुरुंगात पडले, रुग्णालयात दाखल, वकिलाची कोर्टात माहिती

| Updated on: May 02, 2022 | 5:23 PM

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक गेल्या अनेक दिवसांपासून तुरूंगात आहेत. आता त्यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Nawab Malik : नवाब मलिक तुरुंगात पडले, रुग्णालयात दाखल, वकिलाची कोर्टात माहिती
नवाब मलिक
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) गेल्या अनेक दिवसांपासून तुरूंगात आहेत. आता त्यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल (JJ Hospital) करण्यात आले आहे. त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात येण्याचीही शक्यता आहे. नवाब मलिक यांच्या प्रकृतीचे कारण देत त्यांच्या वकिलांकडून जामीन अर्ज करण्यात आला. मात्र ईडीने (ED) जामीन अर्जाला विरोध केला आहे. एका जमीन खरे व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याच प्रकरणात ईडीने त्यांना अटक केली आहे. त्यांच्या अटकेवरून जोरदार राजकारण रंगल्याचेही दिसून आले. यावरून अनेक राजकीय आरोप प्रत्यारोपही झाले. गेल्या अनेक दिवसांपासून मलिकांची जामिनासाठी धडपड सुरू आहे. मात्र अजूनही त्यांना जामीन मिळालेला नाही.

जामिनासाठी अनेक दिवसांपासून धावाधाव

गेल्या अनेक दिवसांपासून मलिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यातच शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका स्वीकारली नाही आणि दुसरीकडे पीएमएलए न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी 6 मे पर्यंत वाढवली. त्यामुळे मलिकांचा पाय आणखी खोलता गेला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती, मात्र त्या ठिकाणीही त्यांची निराशा झाली आहे. ज्याअंतर्गत उच्च न्यायालयाने त्यांच्या तात्काळ सुटकेचा अंतरिम अर्ज फेटाळला आणि मलिकांसमोरचा तो पर्यायही संपला. त्यामुळे आता त्यांच्या तब्येतीचे कारण देत त्यांच्या वकिलांकडून जामीन मागण्यात आला मात्र त्यालाही ईडीने विरोध केला.

हे सुद्धा वाचा

एएनआय वृत्तसंस्थेचे ट्विट

एसआयच्या ट्विटमध्ये काय?

न्यायालयाने जेजे रुग्णालयाकडून नवाब मलिक यांच्या प्रकृतीबाबत अहवाल मागवला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना खासगी रुग्णालयात हलवायचे की नाही यावर 5 मे रोजी सुनावणी होईल. मलिकच्या वकिलाच्या विनंतीनंतर न्यायालयाने मलिक यांची मुलगी निलोफर आणि जावई समीर खान यांना रुग्णालयात भेटण्याची परवानगी दिली. असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. त्यामुळे आता पुढच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.