मुंबई – नवाब मलिकांना (Nawab malik) मुंबई सत्र न्यायालायाने (Mumbai Sessions Court) तात्पुरता दिलासा दिला आहे. मलिकांना खासगी रूग्णालयात उपचार घेण्याची परवानगी न्यायालयाने मान्य केली आहे. विशेष म्हणजे उपचारादरम्यान त्यांच्या एका मुलीला सोबत राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. नवाब मलिक यांना वैद्यकीय उपचार घेण्यासाठी न्यायालयाने जामीन नाकारला आहे.पण मलिकांना कुर्ला (Kurla)येथील क्रिटी केअर रूग्णालयात उपचार घेणार आहेत. त्यावेळी रूग्णालयाबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच दिलेल्या सरकारी सुरक्षेचे पैसे सुध्दा मलिक यांना भरावे लागणार आहेत.
नवाब मलिकांना फेब्रुवारी महिन्यात ताब्यात घेतलं
नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने फेब्रुवारी महिन्यात अटक केली होती. त्यानंतर कोर्टात युक्तिवाद करताना ईडीने मलिक यांच्यावर टेरर फंडिंगचा आरोप केला होता. नवाब मलिक हे अंडरवर्ल्ड लोकांशी संबंधित असून त्यांच्यासोबत हवालासारख्या बेकायदेशीर कामातही सहभागी असल्याचे ईडीने तेव्हा न्यायालयाला सांगितले होते. नवाब मलिक हे टेरर फंडिंगसारख्या कारवायांमध्ये गुंतले आहेत. या प्रकरणी अधिक तपास करणे आवश्यक असल्याचे ईडीने म्हटले आहे. त्यानंतरच त्याचे आणि अंडरवर्ल्डचे कनेक्शन समोर येईल.
मालमत्ता जप्त केल्या
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने मलिकच्या अनेक मालमत्ता जप्त केल्या आहेत. नवाब मलिक सध्या मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये बंद आहेत. नवाब मलिकांना फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली होती. संलग्न मालमत्तांमध्ये कुर्ला पश्चिम, मुंबई उपनगरातील गोवा कंपाऊंड, एक व्यावसायिक भूखंड, महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील 147.79 एकर शेतजमीन, कुर्ला पश्चिम येथील तीन फ्लॅट, वांद्रे पश्चिम येथील दोन निवासी सदनिका इत्यादी मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.