औरंगाबाद : राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय वाघचौरे यांना उमेदवारी डावलल्याने एक कार्यकर्त्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना रक्ताने पत्र (NCP activist wrote letter from blood) लिहीले आहे. युवराज चावरे असे रक्ताने पत्र लिहिणाऱ्या कार्यकर्त्याचे नाव (NCP activist wrote letter from blood) आहे. युवराज हा औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात राहणारा राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता आहे.
येत्या विधानसभा निवडणुकीत पैठण विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार संजय वाघचौरे यांना उमेदवारी डावलण्यात आली आहे. याचा निषेध करण्यासाठी नाराज झालेल्या युवराजने रक्ताने जयंत पाटील यांना पत्र (NCP activist wrote letter from blood) लिहिले आहे.
गेल्या 20 वर्षांपासून या पैठण तालुक्यात संजय वाघचौरे यांनी राष्ट्रवादी जिवंत ठेवली. त्यांनाच डावलून पक्षाने काल प्रवेश केलेल्या एकाला उमेदवारी दिली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. शिवस्वराज्य असो किंवा हल्लाबोल यासारखे अनेक पक्षाचे कार्यक्रम संजू भाऊंनी स्वखर्चातून केले. तालुक्यात पक्ष वाढीसाठी पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरत पक्ष बांधणी केली आणि आज त्यांच्यावर अन्याय झाला. पवारसाहेब, अजितदादा व जयंत पाटील साहेब आपल्या शब्दाच्या पुढे कधीही न गेलेले संजय वाघचौरे यांच्यावर हा अन्याय का? असा प्रश्नही युवराजने उपस्थित केला आहे.
या करिता हे रक्तरंजित पत्र लिहीत आहे. साहेब अजूनही वेळ गेलेली नाही. लवकरच योग्य तो निर्णय घ्यावा ही नम्र विनंती. अन्यथा पैठण तालुक्यात निष्क्रीय लोकांच्या हातात पक्ष उमेदवार गेल्यामुळे पक्षाचे अस्तित्व धोक्यात येण्यास वेळ लागणार नाही. अशा आशयाचे पत्र युवराज चावरे या कार्यकर्त्याने लिहिले आहे.
युवराजने लिहिलेल्या या पत्रामुळे राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ (NCP activist wrote letter from blood) उडाली आहे. दरम्यान त्याच्या या पत्रावर पक्ष काय निर्णय घेणार हे पाहणे नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहेत.