पुणे : शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adharao Patil) यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. “वढू येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेत, ही नक्कीच आनंदाची बाब आहे. परंतु,शिवाजीराव आढळराव यांनी असं विधान केलं की, मालिकेच्या दृष्टिकोनातून अमोल कोल्हे याने त्यामध्ये स्वराज्य रक्षक हे नाव घुसडण्याचा प्रयत्न केला. हे चूक आहे. असा आरोप करणं हे राजकीय वैचारिक दारिद्र्याचं लक्षण आहे”, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.