Amol Mitkari | देवेंद्र फडणवीस वैफल्यग्रस्त असल्याने असे विधान करतायेत, अमोल मिटकरीचा फडणवीसांना टोला

| Updated on: Feb 14, 2023 | 9:49 AM

"आता चोराच्या उलट्या बोंबा म्हटलं पाहिजे, गद्दारी कुणी केली हे महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे. त्याच्यामुळे गद्दारांना लोकं धडा शिकवतील असं माझं म्हणणं आहे.

Amol Mitkari | देवेंद्र फडणवीस वैफल्यग्रस्त असल्याने असे विधान करतायेत, अमोल मिटकरीचा फडणवीसांना टोला
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : टिव्ही 9 मराठीच्या “महाराष्ट्राचा महासंकल्प” (Maharashtra Mahasankalp) या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस (devendra fadnvis) यांनी मोठे गौप्यस्फोट केला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. कालच्या कार्यक्रमात फडणवीसांनी मोठी विधान केल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात (maharashtra politics) खळबळ माजली होती.”पहाटेचं जे सरकार स्थापन झाला होतं, ते शरद पवारांची (sharad pawar) चर्चा केल्यानंतरच सरकार स्थापन झालं होतं असं विधान केल्यानंतर अजित पवारांनी त्यांना उत्तर दिलं आहे.

“आता झालं गेलं गंगेला मिळालं. आता हे गौप्यस्फोट करण्यामागचं नेमका फडणवीसांचा डाव काय असला पाहिजे हे त्यांना माहित आहे, पाचही जागा भारतीय जनता पार्टीच्या हातातून गेल्यात विधानपरिषदेच्या आणि आता पुणे आणि कसब्याच्या पिंपरी-चिंचवड आणि कसब्याच्या दोन निवडणुका त्यामुळे वैफल्यग्रस्त झाल्यानंतर अशी विधानं त्यांच्याकडून येत आहेत असा टोला फडणवीसांना मिटकरी यांनी लगावला.

“आमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी मला असं वाटतंय न बोललेलं बरं आणि जर त्यांना एवढं माहिती आहे तर ते स्वतः पवार साहेब सांगतील ना किंवा अजितदादा सांगतील दुसऱ्याच्या घरात कशाला झाकून पाहायचं? त्याच्यामुळे फडणवीस साहेबांनी आपलं झोपलं तेवढं सांभाळ आम्ही आमची झोपडी सांभाळू असाही सल्ला दिला.”

हे सुद्धा वाचा

देवेंद्र फडणवीस काय म्हणतात याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महत्व देत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जी भूमिका अजितदादांनी मांडली, ती तुमच्या चॅनेलसमोर मांडली. त्याची उत्तरं आदरणीय दादांनी दिलेली आहेत. त्यामुळे त्यांचा गौप्यस्फोट नाही, तो लवंगी फटाका आहे देवेंद्र फडणवीस आता वैफल्यग्रस्त झालेले असं अमोल मिटकरी वारंवार म्हणाले.

“आता चोराच्या उलट्या बोंबा म्हटलं पाहिजे, गद्दारी कुणी केली हे महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे. त्याच्यामुळे गद्दारांना लोकं धडा शिकवतील असं माझं म्हणणं आहे. तुम्ही प्रामाणिक असता तर तुमच्या पाचही जागा निवडून का नाही आल्या ? विधानपरिषदेमध्ये याचा अर्थ गद्दारीचं फळ तुम्हाला जनतेने दिल आहे. उद्धव ठाकरे गद्दार होते का देवेंद्र फडणवीस गद्दार आहेत? हे येणारा काळ ठरवणार आहे आणि दिल्ली दूर नाही, तुम्ही निवडणूका लावाचं असं आवाहन मिटकरींनी फडणवीसांना दिलं.

“कारण मला एवढी गोष्ट तर माहित पडली आहे की, ज्या जागी भाजपचा पराभव झालेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीसांवर प्रचंड नाराज आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांवर महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे. ती सुद्धा पाळण्यात ते अपयशी होत आहेत” असा चिमटा सुद्धा मिटकरींना काढला.