“दरेकरजी, तुमच्या घरात आंबेडकर, महात्मा फुले यांनी प्रतिमा असेल, तर त्याचा फोटो शेअर करा, अन् एक लाख रूपये घेऊन जा!”

| Updated on: Dec 17, 2022 | 12:06 PM

अमोल मिटकरी यांचं प्रवीण दरेकर यांना ओपन चॅलेंज...

दरेकरजी, तुमच्या घरात आंबेडकर, महात्मा फुले यांनी प्रतिमा असेल, तर त्याचा फोटो शेअर करा, अन् एक लाख रूपये घेऊन जा!
Follow us on

मुंबई : महापुरूषांच्या अवमानाविरोधात महाविकास आघाडीने महामोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चासाठी मविआचे नेते मुंबईत आहेत. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजपचे नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना ओपन चॅलेंज दिलंय. त्यासोबत एक लाखांचं बक्षीसही त्यांनी जाहीर केलंय.

“प्रवीण दरेकरजी, तुमच्या घरात जर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनी प्रतिमा असेल, तर त्याचा फोटो शेअर करा, अन् एक लाख रूपये घेऊन जा!”, असं ओपन चॅलेंज मिटकरी यांनी दिलंय. शिवाय आता चॅलेंज दिलं म्हणून दुकानातून नवी प्रतिमा घेऊन याल आणि लालसेपायी त्याचा फोटो शेअर कराल तर तसं चालणार नाही. आधीपासून जर तुमच्या घरात फुले, आंबेडकर यांची प्रतिमा असेल तर त्याचा फोटो शेअर करा, असं मिटकरी म्हणालेत.

‘महामोर्चा’

महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी ‘महामोर्चा’ काढत आहे. मुंबईच्या भायखळा इथल्या रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनीपासून या महामोर्चाची सुरुवात होईल तर सीएसएमटी स्टेशनच्या समोर टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीच्या इथे हा मोर्चा संपेन. महाविकास आघाडीच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. या महामोर्चासाठी सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.