विधानसभेच्या जागा 288, राष्ट्रवादीचं ‘मिशन 100’; काँग्रेस, ठाकरे गटाचं मिशन काय?

| Updated on: Nov 05, 2022 | 5:20 PM

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही आपल्या भाषणात मिशन 100चा नारा दिला आहे. पक्षाने विदर्भात ताकद दिली पाहिजे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात आपली ताकद निर्माण झाली पाहिजे.

विधानसभेच्या जागा 288, राष्ट्रवादीचं मिशन 100; काँग्रेस, ठाकरे गटाचं मिशन काय?
विधानसभेच्या जागा 288, राष्ट्रवादीचं 'मिशन 100'; काँग्रेस, ठाकरे गटाचं मिशन काय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

शिर्डी: राष्ट्रवादीचं (ncp) दोन दिवसाचं मंथन शिबीर शिर्डीत पार पडलं. रुग्णालयात असूनही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) या बैठकीला हजर राहिले. तर वैयक्तिक कारणामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (ajit pawar) या शिबिराला हजर न राहिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या शिबिरातून राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागल्याचे संकेत दिले असून राष्ट्रवादीने मिशन 100चा नारा दिला आहे. राष्ट्रवादीच्या या नाऱ्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यात विधानसभेच्या 288 जागा आहेत. त्यापैकी राष्ट्रवादीने 100 जागा जिंकण्याचा नारा दिला आहे. मग महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरे गट किती जागा लढवणार? अशी चर्चा आता या निमित्ताने रंगू लागली आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिर्डीच्या शिबिरातून विधानसभेसाठी मिशन 100चा नारा दिला आहे. मिशन 100 ची घोषणा आम्ही केलेली आहे. आमच्या पद्धतीने आम्ही जास्तीत जास्त जागा लढवण्याचा प्रयत्न करू. जेवढे निवडून येऊ शकतात त्या सर्वांना आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करू, असं जयंत पाटील म्हणाले.

हे सुद्धा वाचा

मध्यावधी निवडणुकांबाबत म्हणाल तर सध्याची जी परिस्थिती आहे, ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाचा निकाल लागणं अजून अपेक्षित आहे. त्यामुळे सध्या राज्यात अस्थिर परिस्थिती आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच मध्यावधी निवडणुकीची शक्यता वर्तवली जात आहे, असं ते म्हणाले.

अजित पवार यांचा नियोजित कार्यक्रमातच ठरलेला होता. माझ्या परवानगीने ते आधीच गेले होते आणि त्यांचा कार्यक्रम काही महिन्यांपूर्वीच ठरला होता. शिबिराचा कार्यक्रम नंतर ठरला आणि त्यामुळे त्यांनी विनंती केली म्हणून ते गेले, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही आपल्या भाषणात मिशन 100चा नारा दिला आहे. पक्षाने विदर्भात ताकद दिली पाहिजे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात आपली ताकद निर्माण झाली पाहिजे.

आपले मिशन 100 आहे. विश्वास आहे हे मिशन घेऊन पुढे जाऊ. विधानसभा निवडणुकीत मिशन 100 असणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे यांनी मध्यावती निवडणूक संकेत दिले आहेत. धर्मांध शक्ती रोखायची असेल तर राष्ट्रवादी ताकदीने लढेल. मध्यवर्ती निवडणूक लागेल हिच भीती शिंदे फडणवीस सरकारला आहे, असं आमदार अमोल मिटकरी म्हणाले.