कोकणात शिवसेनेची एकीकडे भाजपकडून कोंडी, राणेंचीही डोकेदुखी

| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

रत्नागिरी : यावेळच्या लोकसभा निवडणुकीत नवनवी समीकरणे पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कोकणातही असंच समीकरण जुळताना दिसतंय. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आता कुरघुडीचं राजकारण रंगलंय. कोकण मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या खेळीने सध्या शिवसेनेलाही धडकी भरली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याऐवजी राष्ट्रवादी पडद्याआडून राणेंना मदत करू शकते. त्यामुळे राष्ट्रवादीचे रायगड […]

कोकणात शिवसेनेची एकीकडे भाजपकडून कोंडी, राणेंचीही डोकेदुखी
Follow us on

रत्नागिरी : यावेळच्या लोकसभा निवडणुकीत नवनवी समीकरणे पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कोकणातही असंच समीकरण जुळताना दिसतंय. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आता कुरघुडीचं राजकारण रंगलंय. कोकण मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या खेळीने सध्या शिवसेनेलाही धडकी भरली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याऐवजी राष्ट्रवादी पडद्याआडून राणेंना मदत करू शकते. त्यामुळे राष्ट्रवादीचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांचे समीकरण जळू शकते.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ राज्यातील महत्वाच्या 10 मतदारसंघापैकी एक आहे. या मतदारसंघातून शिवसेना आणि राणे कुटुंबाची प्रतिष्ठा इथे पणाला लागणार आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निलेश राणे निवडणूक लढवणार आहेत. तर शिवसेनेकडून खासदार विनायक राऊत निवडणूक रिंगणात असतील. तर आघाडीकडून हा मतदारसंघ काँग्रेसच्या उमेदवाराला सोडला गेलाय. मात्र कोकण पदवीधर मतदारसंघात सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांना राणेंनी केलेल्या मदतीची परतफेड करण्यासाठी राष्ट्रवादी सध्या गेम प्लॅनमध्ये आहे. त्यामुळेच आघाडीचा उमेदवार असला तरी राष्ट्रवादी आपली सर्व ताकद नारायण राणेंच्या मागे उभी करण्याच्या रणनीतीमध्ये आहे.

नारायण राणे आणि तटकरे यांचे सख्य आजही कायम आहे. भास्कर जाधव चिपळुणातून राणेंना डोकेदुखी बनू शकतात. त्यामुळे राणेंच्या बाजूने रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामधली राष्ट्रवादीची ताकद लावून राणेंना मैत्रीचा हात तटकरे देणार हे नक्की मानलं जातंय. त्यामुळे काही वेळा उघड, तर काही वेळा तटकरे राणेंना छुपा पाठिंबा देत राहतात.

एकीकडून भाजपकच्या कार्यकर्त्यांकडून कोंडी आणि दुसरीकडे राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा, यामुळे शिवसेनेला बालेकिल्यामधील टक्कर तेवढी सोपी नाही. यामुळे राष्ट्रवादीच्या राणेंच्या मदतीच्या खेळीमुळे शिवसेना सध्या राणेंवर निशाणा साधून आहे. त्यामुळे राणे चौथी आघाडी शोधत असल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केलाय.

कोकणात प्रचारापेक्षा सध्या कुरघुडीचं राजकारण खेळलं जातंय. कोकणात सभांच्या धडाक्यापेक्षा या राजकारणाने एकमेकांचा काटा आणि मैत्री निभावण्याचा अनोखा फंडा फक्त कोकणातल्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात पाहायला मिळतोय.