बीड : राज्यात नुकतीच नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी पार पडली. या निवडणुकीत बीड (Beed) जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) अपयशाला सामोरं जावं लागलं होतं. बीडमधील नगरपंचयात निवडणुकीच्या निकालाची चर्चा संपूर्ण राज्यभर झाली होती. बीडमधील नगरपंचायत निवडणुकीतील पराभवामुळं राष्ट्रवादी काँग्रेसनं संघटनात्मक फेरबदल सुरु केले आहे. बीड जिल्हा राष्ट्रवादीत मोठा फेरबदल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून राजेश्वर चव्हाण (Rajeshwar Chavan) यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष बजरंग सोनावणे यांना अखेर डीच्चू देण्यात आला आहे. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांच्या स्पर्धेत असलेले नुकतेच काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत आलेले राजकिशोर मोदी आणि राष्ट्रवादी माजी आमदार पृथ्वीराज साठे हे मात्र नाराज झाले आहेत. नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला मिळालेले अपयश पाहता राष्ट्रवादीत मोठे फेरबदल होण्याची चर्चा होती. शिवाय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील काही महिन्यांपूर्वी बीडमध्ये बैठक घेतली होती. त्यावेळी जिल्हाध्यक्ष बदलण्याचा इशारा दिला होता. आज अखेर नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून राजरेश्वर चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील हातोला येथील राजेश्वर चव्हाण यांची राजकीय कारकीर्द चांगली आहे. राजेश्वर चव्हाण हे म्हाडाचे संचालक राहिले आहेत. शिवाय ते जिल्हा परिषदचे माजी सदस्य आहेत. सध्या ते अंबाजोगाई तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत. आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुंबईत नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.
बीड जिल्हा राष्ट्रवादीच्या नूतन जिल्हाध्यक्षाच्या निवड स्पर्धेत अनेक जण इच्छुक होते. काँग्रेसला हात देऊन नुकतीच मनगटात राष्ट्रवादी घड्याळ घातलेले राजकिशोर मोदी आणि केजचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या गटात नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत मोठा पेच निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. @Jayant_R_Patil यांच्या मान्यतेने श्री. राजेश्वर चव्हाण यांची बीड जिल्ह्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या खासदार @supriya_sule यांच्या हस्ते राजेश्वर चव्हाण यांना आज नियुक्तीपत्र देण्यात आले.#NCP #नियुक्ति_पत्र pic.twitter.com/5BpVOsCmjE
— NCP (@NCPspeaks) February 25, 2022
मनसेच्या पदाधिकाऱ्याला भाजपची मारहाण, अटकेसाठी पोलीस स्टेशनवर मोर्चा धडकला