Guru Purnima | शरद पवारांमध्ये विकासाचा ध्यास, माझ्या जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान : जयंत पाटील

| Updated on: Jul 06, 2020 | 12:40 AM

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी शरद पवारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. (Sharad Pawar is My Guru Said Jayant Patil on  Guru Purnima)

Guru Purnima | शरद पवारांमध्ये विकासाचा ध्यास, माझ्या जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान : जयंत पाटील
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच माझे गुरू… माझ्या जडणघडणीत पवारसाहेबांचे मोठे योगदान आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी शरद पवारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. (Sharad Pawar is My Guru Said Jayant Patil on  Guru Purnima)

आज संपूर्ण भारतात गुरुपौर्णिमा साजरी केली जात आहे. प्रत्येकजण आपल्या गुरुजनांप्रती विविध माध्यमातून आदर व्यक्त करत आहे. जयंत पाटील यांनीही खासदार शरद पवार यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत एक व्हिडीओ आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केला आहे. तसेच शरद पवारांच्या बऱ्याच आठवणींना उजाळा दिला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

जयंत पाटील यांनी व्हिडीओ नेमकं काय म्हटलं?

“बापू हे काँग्रेसचे महत्त्वाचे नेते होते. त्यामुळे आमच्या घरी बऱ्याच थोरामोठ्या नेत्यांची उठबस होत असे. मात्र पवारसाहेबांच्या व्यक्तिमत्वाविषयी मला पूर्वीपासूनच आकर्षण होते. इतरांपेक्षा हा नेता वेगळा वाटायचा. पवारसाहेबांमध्ये फक्त विकासाचा ध्यास दिसायचा,” असे जयंत पाटील यांनी व्हिडीओत म्हटलं आहे.

“शिमला येथे एआयसीसीचे अधिवेशन होते. तेव्हा मीही बापूंसह अधिवेशनाला गेलो होतो. पवारसाहेब आणि आमची एकाच ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली होती. तेव्हा आदरणीय पवारसाहेबांना पहिल्यांदा जवळून अनुभवता आले.”

“पवारसाहेबांना मुख्यमंत्रिपदाची पहिली टर्म काही पूर्ण करता आली नाही. तेव्हा मुख्यमंत्री बदलण्याची एक मोहीम सुरू झाली होती. तेव्हा आमच्या सांगलीच्या सर्व आमदारांनी सुधाकर नाईक यांना पाठिंबा देण्याचे ठरवले होते. त्यामुळे मलाही सुधाकर नाईक यांना पाठिंबा द्यावा लागला. कालांतराने तेही सरकार पडले आणि आदरणीय साहेब पुन्हा मुख्यमंत्री झाले.”

“मला वाटलं साहेब आता काही आपल्या कामाची नोंद घेणार नाही. एकेदिवशी आमदार म्हणून एक काम घेऊन साहेबांकडे गेलो होतो. चिठ्ठीत माझं नाव पाहताच त्यांनी मला सर्वात आधी बोलावून घेतले. जेवणाच्या वेळी भेटायला ये, म्हणून सांगितले. भेटीदरम्यान साहेबांनी माझा मतदारसंघ पाहण्याची इच्छा व्यक्त केली.”

“मी साहेबांच्या दौऱ्याचे संपूर्ण नियोजन केले. एका कार्यक्रमानिमित्त बोलावले. मोठी जंगी सभा घेतली. तेव्हापासून साहेबांनी मला जवळ केले. माझ्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावली,” अशी आठवणही जयंत पाटील यांनी सांगितली. (Sharad Pawar is My Guru Said Jayant Patil on  Guru Purnima)

संबंधित बातम्या :

राज्यातील हॉटेल-लॉज लवकरच सुरु करण्याचा विचार, मुख्यमंत्री आणि हॉटेल्स असोसिएशनच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

शिवसेना नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणतात…