पुणे : राष्ट्रवादीचे माजी आमदार बापूसाहेब पठारे कुटुंबीयांच्या त्रासाविरोधात सूनेने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली. हा प्रकार पुण्यातील वडगाव शेरीला मुख्यमंत्र्यांच्या भर प्रचारसभेत घडला. यावेळी स्नेहा पठारे यांनी लाऊडस्पीकर वरुन मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं.
मुख्यमंत्री भाषणाला उभे राहताच स्नेहा अचानक उभ्या राहिल्या. हातातील बॅगेतील छोटा लाऊडस्पीकर वरुन त्या बोलू लागल्या. मुख्यमंत्री साहेब मला तुमच्याशी बोलायचंय, असं म्हणत त्या उभ्या राहिल्या तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांना नंतर बोलायला वेळ देतो, असं म्हटलं. मुख्यमंत्र्यांच्या संवादानंतर स्नेहा पठारे खुर्चीवर बसल्या. यावेळी संबंधित महिलेला बाहेर काढण्यासाठी पोलीस गेले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना बाजूला व्हा सांगत मी नंतर त्यांच्याशी बोलतो, असं म्हटले. त्यानंतर पोलीस बाजूला झाले.
स्नेहा पठारे यांनी पती सासू सासरे, दीर आणि आई वडिलांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चंदननगर पोलीस ठाण्यात 7 जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत स्नेहा यांनी पतीने इच्छेविरुद्ध अनैसर्गिक संभोग आणि दिराने इच्छेविरुद्ध शरीर संबंध ठेवल्याचा आरोप केला. शरीर संबंध ठेवल्याची माहिती कुणाला सांगितली तर गायब करील, अशी धमकी दीराने दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. सासरा बापूसाहेब पठारे, सासू आणि नणंद आई-वडिलांनी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचाही आरोप करण्लायात आला आहे. डिसेंबर 2008 ते फेब्रुवारी 2019 या काळात हा सर्व अत्याचार सुरु असल्याचा आरोप पीडितेना केला आहे.
पाहा व्हिडीओ: