औरंगाबाद : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिंदे सरकारच्या भवितव्याविषयी भविष्यवाणी केली आहे. शिंदे (Eknath Shinde) सरकार पडणार असल्याचं जयंत पाटील म्हणालेत. ” कॅलक्युलेशनप्रमाणे जेव्हा गणित बसायला लागेल तेव्हा सरकार बरखास्त करतील. तेव्हा एकनाथ शिंदेना लक्षात येईल की किती मोठी चूक केली आहे ते”, असं जयंत पाटील म्हणालेत. अस्वस्थता प्रचंड आहे. सरकार पूर्ण काळ करण्याचा विषयच नाही.सरकार लवकर कोसळेल, असं जयंत पाटील म्हणालेत.